मुंबई : टेलिव्हिजनचा लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉसचा आणखी एक सीझन संपला. रविवारी शोचा १५ वा सीझन पूर्ण झाला. तेजस्वी प्रकाश ने १५ व्या सीझनचं विजेतेपद पटकावलंं. बिग बॉस १५ ची ट्रॉफी जिंकण्यासोबतच तेजस्वी प्रकाशने ४० लाखांची रोख रक्कमही जिंकली. त्याचवेळी, शोच्या ग्रँड फिनालेमध्ये प्रेक्षकांसाठी भरपूर मनोरंजन होते. अनेक स्टार कलाकारांनी या एपिसोडमध्ये धमाकेदार परफॉर्मन्स दिले. विशेष म्हणजे बिग बॉसच्या मागील सीझनचे विजेते असलेले पाच सदस्यही बिग बॉस १५ च्या ग्रँड फिनालेचा भाग झाले होते. यादरम्यान, सर्वांची आवडती सदस्य देखील यावेळी बिग बॉसच्या मंचावर पोहोचली होती. यावेळी तिने दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाला श्रद्धांजली वाहिली. बिग बॉसच्या मंचावर येताच शहनाजने गॅरी संधूच्या 'ये बेबी' गाण्यावर डान्स केला. यासोबतच सलमानला पाहून ती भावुकही झाली. त्यानंतर सलमानने तिला मिठी मारत दिलासा दिला. यावेळी सिद्धार्थच्या आठवणीत सलमान आणि शहनाज दोघेही भावुक झाले होते आणि ते अश्रू रोखू शकले नाहीत. थोड्यावेळाने शहनाजने सलमानसोबत खूप धमाल केली. यादरम्यान शहनाज सलमानला सांगते की, 'ती आता संपूर्ण भारताची शहनाज गिल झाली आहे तर भारताची कतरिना कैफ पंजाबची झाली आहे. कारण तिचं लग्न विकी कौशलसोबत झाले आहे.' यानंतर शहनाज सलमानला बोलते की, 'तुम्ही सिंगलच रहा. तुम्ही सिंगल फार आनंदी दिसता.' त्यावर सलमान बोलतो की, 'हा.. जेव्हा होईन तेव्हा नक्कीच आनंदी होईन.'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/UKkWTF0Ra