मुंबई- ६ फेब्रुवारीला सकाळी गानकोकिळा आणि भारतरत्न यांच्या निधनाची बातमी येताच सर्वांना धक्का बसला होता. चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली होती. लता मंगेशकर यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी अनेक अवयव निकामी झाल्याने निधन झाले. लता मंगेशकर गेल्या २८ दिवसांपासून ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल होत्या. वयाच्या ५ व्या वर्षापासून कार्यरत असलेल्या लता मंगेशकर यांनी जवळपास ६ दशकं काम केले. हजारो गाणी गायली आणि अभिनयही केला. पण लता दीदींचा संगीत विश्वातील प्रवास सोपा नव्हता. जिथे एकदा त्यांना अन्नात विष टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला, तिथे सुरुवातीच्या काळात त्याच्यावर अत्याचारही झाले. गायक, अभिनेता आणि संगीत दिग्दर्शक जीएम दुर्रानी यांनी एकदा लता मंगेशकर यांना त्यांच्या कपड्यांबद्दल टोमणा मारला होता. जीएम दुर्रानी ४० आणि ५० च्या दशकात भारतीय संगीत जगतात राज्य करत होते. त्या काळात जीएम दुर्रानी म्हणजेच गुलाम मुस्तफा दुर्रानी यांचंच नाव सर्वत्र होते. मोहम्मद रफी यांनी संगीताच्या जगात प्रवेश केला नव्हता. त्याचवेळी लता मंगेशकर यांचीही सर्वत्र चर्चा होती. पण आपण ज्या घटनेबद्दल बोलत आहोत ती १९४९ ची आहे. 'नॅशनल हेराल्ड इंडिया'मध्ये प्रसिद्ध झालेल्या IANS च्या वृत्तानुसार, हे 'चांदनी रात' चित्रपटादरम्यानचे आहे. या चित्रपटात सायरा बानोच्या आईचे नाव नसीम बानो होते. याच चित्रपटात लता मंगेशकर जीएम गुरानी यांच्यासोबत संगीताचे उस्ताद नौशाद यांच्यासाठी एक गाणे रेकॉर्ड करणार होत्या. मात्र लता मंगेशकर गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी पोहोचल्या पण त्या रेकॉर्डिंग न करताच परतल्या. रिपोर्टनुसार, जीएम दुर्रानी यांनी लता मंगेशकर यांच्यासोबत योग्य वर्तन केले नाही. लतादीदी अतिशय लाजाळू आणि नम्र स्वभावाच्या होत्या, तर दुर्रानी यांचा थाट काही वेगळा होता. दुर्रानी यांनी लता मंगेशकर यांची चेष्टा करायला सुरुवात केली. त्यांना वाटले की लता लाजाळू आहेत आणि काही बोलू शकणार नाहीत. दुर्रानींनीने विचारले - गळ्यात काय घातले आहे? पांढरी चादर का गुंडाळली आहेस? एकदा असे घडले की लता मंगेशकर जेव्हा रेकॉर्डिंगसाठी पोहोचल्या तेव्हा जीएम दुर्रानी त्यांची थट्टा उडवण्याचा प्रयत्न करत होते. लता दीदींनी गळ्यात हार घातला होता. त्यांना पाहताच दुर्रानी यांनी लता दीदींना विचारले, 'तू गळ्यात काय घालून आली आहेस?' उत्तरात लताजींनी सांगितले की हस्तिदंताचा हार आहे, जो त्यांना त्यांच्या वडिलांनी भेट म्हणून दिला होता. पण दुर्रानी यांनी दीदींकडे दुर्लक्ष केलं आणि त्यांचा आवाज सोन्याचा असल्याने त्यांनी सोन्याचे दागिने घालावेत असं सांगितलं. यापूढे ते म्हणाले की, 'लता, तू रंगीबेरंगी कपडे का घालत नाहीस? तू अशी कशी पांढरी चादर गुंडाळून येतेस?' लता दीदींनी घेतला कधीही काम न करण्याचा निर्णय यानंतरही जीएम दुर्रानी थांबले नाहीत आणि त्यांनी लता मंगेशकरांवर कौतुकाचा वर्षाव सुरू केला. पण दीदी भडकल्या आणि त्यांनी पुढे कधीही दुर्राणींसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला. लतादीदींसाठी हा सर्वात मोठा आणि जोखमीचा निर्णय होता, कारण त्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात होत्या. त्यांनी त्या काळातील सर्वात मोठ्या गायकासोबत काम करण्यास फक्त नकारच दिला नव्हता तर नौशाद सारख्या संगीतकारासोबत काम करण्याची संधीही गमावण्याची तयारी दाखवली होती. पण लतादीदींनी हिंमत दाखवली आणि आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. दुर्रानी यांच्याबद्दल लता मंगेशकरांनी दिलेलं वक्तव्य याविषयी विचारले असता, लता दीदींनी नंतर एका मुलाखतीत सांगितले की, जीएम दुर्रानी ज्या पद्धतीने माझ्याशी बोलले होते ते मला आवडले नाही. त्यामुळे त्यांनी दुर्राीसोबत गाणे न गाण्याचा निर्णय घेतला. यामुळेच लता मंगेशकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत दुर्रानींसोबत एकही गाणे गायले नाही.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/hmFBfrT