मुंबई- 'आई कुठे काय करते' ही मालिका रंजक वळणावर आली आहे. या मालिकेच्या हटके कथानकामुळे प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अरुंधती आता बदलली आहे,इतके दिवस सरळ साधी असणारी, कोणाला काहीही न बोलणारी अरुंधती आता स्वतःच्या पायावर उभी रहायला शिकली आहे. तसंच तिने तिचा लूक देखील बदला आहे. आता अरुंधती साडीत नाही तर पंजाबी ड्रेसमध्ये दिसत आहे. मालिका सध्या सुरू असलेल्या ट्रॅकमुळे चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेत आता खूप रंजक असे ट्विस्ट येत आहेत. या ट्विस्टमुळे प्रत्येक भाग पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता वाढत आहे. मालिकेत सुरू असलेल्या ट्रॅकनुसार अरुंधती आणि आशुतोष अलिबागला एक दिवस राहिल्याने समृद्धी बंगल्यात खुप मोठं वादळ आलं होतं. अनिरुद्ध तर बोललाच पण कांचनने देखील तिच्या चारित्र्यावर संशय घेतला ,ज्यामुळे अरुंधतीला वाईट वाटते आणि ती घर सोडून निघून जाते. संजनाचा अर्धा प्लान तर यशस्वी झाला. आता संजना अरुंधतीच्या अडचणी आणखीन वाढवण्याचा प्रयत्न करताना दिसतील. हो, हाती आलेल्या माहितीनुसार अप्पांनी अरुंधतीला घर सोडून जाताना जो हिस्सा देण्याच कबूल केलं असतं ते संजनाला पटत नाही, म्हणून आता घराचा हिस्सा अरुंधतीकडून कसा परत घ्यायचा याबद्दल प्लान करताना दिसेल. विशेष म्हणजे या कटात कांचनही तिची मदत करणार आहे, असं सांगितलं जात आहे. दरम्यान एकीकडे अरुंधतीसाठी एकामागोमाग संकटे उभी राहात आहेत. तर दुसरीकडे सुखाची चाहूल ही लागली आहे. मालिकेत अरुंधती आणि आशुतोषची प्रेमकथाही सुरू होणार आहे. तो लवकरच अरुंधतीला त्याच्या प्रेमची कबुली देणार असल्याच सांगितलं जात आहे. या एकसोएक नवीन ट्विस्टसाठी प्रेक्षक पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी खुप आतुर झाले आहेत. याचसोबत त्यांना अनेक प्रश्नही पडले आहेत, ज्याची उत्तर येणाऱ्या आठवड्यात त्यांना मिळतील.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/KWyjhbD