Full Width(True/False)

स्वस्तात मस्त! नोकियाने गुपचूप लाँच केले आहे 'हे' शानदार स्मार्टफोन्स, किंमत १० हजार रुपयांपेक्षा कमी

नवी दिल्ली: ने आपल्या तीन नवीन स्मार्टफोन्सला लाँच केले आहे. यामध्ये Nokia C2 2nd Edition, आणि या स्मार्टफोन्सचा समावेश आहे. कमी किंमतीत येणाऱ्या या हँडसेट्समध्ये जबरदस्त फीचर्स दिले आहेत. फोनसोबतच नोकियाने वायरलेस हेडफोनला देखील सादर केले आहे. फीचर फोनमधून स्मार्टफोनमध्ये अपग्रेड करणाऱ्या यूजर्ससाठी हे हँडसेट्स बेस्ट आहेत. Nokia C21 Plus मध्ये ड्यूल रियर कॅमेरा सेटअप, तर सी२ २nd एडिशन आणि Nokia C21 सिंगल रियर कॅमेरा सेटअपसह येतात. मध्ये पारंपारिक जुने डिस्प्ले डिझाइन दिले आहे. तर Nokia C21 आणि Nokia C21 Plus मध्ये वॉटरड्रॉप स्टाइल नॉच दिला आहे. HMD Global ने नोकिया सी-सीरिजच्या या तीन स्मार्टफोन्ससह नोकिया वायरलेस हेडफोनला देखील लाँच केले आहे. वाचा: किंमतीबद्दल सांगायचे तर Nokia C2 2nd Edition ची किंमत जवळपास ६,७०० रुपयांपासून सुरू होते. तर Nokia C21 ची किंमत ८,४०० रुपये आणि Nokia C21 Plus स्मार्टफोनची किंमत जवळपास १०,१०० रुपये आहे. या फोनची विक्री एप्रिल महिन्यात सुरू होईल. नोकिया सी२१ मार्च अखेरीस विक्रीसाठी उपलब्ध आहे. नोकिया वायरलेस हेडफोनची किंमत जवळपास ३,८०० रुपये आहे. सध्या या फोन्सला केवळ अमेरिकेत लाँच केले आहे. लवकरच, कंपनी इतर बाजारांमध्ये देखील फोन्सला उपलब्ध करण्याची शक्यता आहे. Nokia C2 2nd Edition चे स्पेसिफिकेशन्स ड्यूल सिम (नॅनो) सपोर्टसह येणारा Nokia C2 2nd Edition स्मार्टफोन अँड्राइड ११ ओएसवर काम करतो. यामध्ये ५.७ इंच FWVGA डिस्प्ले दिला आहे. फोन क्वाड-कोर मीडियाटेक एसओसीसह येतो, जो १.५ गीगाहर्ट्जवर कॉर्टेक्स-ए ५३ च्या ४ कोरने सुसज्ज आहे. यात रियरला ५ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला असून, जो फोकस लेंस आणि एलईडी फ्लॅशसह येतो. सेल्फीसाठी फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह २ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये स्टँडर्ड ३२ जीबी स्टोरेज मिळते. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डद्वारे २५६ जीबीपर्यंत वाढवू शकता. फोनमध्ये २४०० एमएएचची रिमूव्हेबल बॅटरी दिली आहे. Nokia C21 आणि Nokia C21 Plus चे स्पेसिफिकेशन्स ड्यूल-सिम (नॅनो) सपोर्टसह येणारा Nokia C21 स्मार्टफोन अँड्राइड ११ (गो एडिशन) वर काम करतो. यात ६.५ इंच एचडी+ डिस्प्ले दिला आहे. तसेच, ३ जीबी रॅम मिळते. यात फिक्स्ड फोकस लेंस आणि एलईडी फ्लॅशसह ८ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला आहे. तर फ्रंटला ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. यात ३००० एमएएचची बॅटरी मिळते. Nokia C21 Plus बद्दल सांगायचे तर हा देखील अँड्राइड ११ (गो एडिशन) वर काम करतो. यात ६.५ इंच एचडी+ डिस्प्ले दिला असून, ४ जीबीपर्यंत रॅम मिळेल. पॉवरसाठी ४००० एमएएचची बॅटरी मिळते. फोनमध्ये रियरला एलईडी फ्लॅशसह १३ मेगापिक्सल प्रायमरी सेंसर आणि २ मेगापिक्सल डेप्थ सेंसर आहे. तसेच, फ्रंटला ५ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/ebaGEC7