मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण हिच्या निर्मितीत बनलेला हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी पासूनच चर्चेत आहे.नुकताच हा चित्रपट ओटीटी प्लटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.अनेक प्रेक्षकांना हा चित्रपट आवडला नाहीत,परंतु काही प्रेक्षक असेही आहेत ज्यांनी हा चित्रपट डोक्यावर घेतला आहे.काही समीक्षकांनीही या चित्रपटाचं कौतुक केलं आहे,परंतु काही समीक्षकांनी प्रेक्षकांप्रमाणेच या चित्रपटावर टीका केली आहे. त्यानंतर नुकतीच या चित्रपटाची सक्सेस पार्टी देखील दणक्यात पार पडली. संपूर्ण टीमं या सक्सेसचं सेलिब्रेशन केलं आहे. सक्सेस पार्टीचा फोटो पाहिल्यानंतर सोशल मीडिया नेटकऱ्यांनी गहराइयाँच्या टीमला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. फ्लॉफ चित्रपटाची कुठे पार्टी करताय, असा टोलाही नेटकऱ्यांनी दीपिका आणि इतर कलाकारांना लगावला आहे. गहराइयां हा चित्रपट पाहिल्यानंतरही यूजर्सनी खूप नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या होत्या.एका यूजरने लिहिले होते, 'यापेक्षा क्राइम पेट्रोल पाहणे चांगले आहे'. मानवी नातेसंबंधाचे विविध पदर, या नात्यांमुळे होणारी ओढाताण, सारं काही असूनही नाती टिकवताना होणारी दमछाक, अपेक्षाभंगाचं दु:ख असा सारा ‘कंटेट’ असलेला मुख्य प्रवाहातला चित्रपट सध्या दुर्मीळ होत चालला आहे. शकुन बात्राचा ‘गहरारियाँ’ अशाच एका नातेसंबंधाची गोष्ट सांगतो.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/RzhmtFn