नवी दिल्ली: सरकारी टेलिकॉम कंपनी आपल्या यूजर्सला आकर्षित करण्यासाठी अनेक शानदार प्लान्स ऑफर करत असते. कंपनीकडे कमी किंमतीत येणारे काही स्वस्त देखील आहेत. कंपनीच्या पोर्टफोलियोमधील स्वस्त FTTH ब्रॉडबँड प्लान्स उपलब्ध असून, यामध्ये ३३०० जीबीपर्यंत डेटा मिळतो. कंपनीच्या या प्लान्सची वैधता ३० दिवस असून, यामध्ये १०० एमबीपीएसच्या स्पीडने इंटरनेट वापरू शकता. यातील काही प्लान्स असे आहेत जे प्रीमियम, प्रीमियम आणि वूट सिलेक्ट सारख्या लोकप्रिय ओटीटी अॅप्सचे सबस्क्रिप्शन्स ऑफर करतात. या स्वस्त ब्रॉडबँड प्लान्सविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचाः बीएसएनएलचा ४४९ रुपये आणि ५९९ रुपयांचा ब्रॉडबँड प्लान आपल्या ४४९ रुपयांच्या ब्रॉडबँड प्लानमध्ये एकूण ३३०० जीबी डेटा देत आहे. या प्लानमध्ये तुम्ही ३० Mbps च्या स्पीडने नेट वापरू शकता. डेटा लिमिट समाप्त झाल्यानंतर स्पीड २ एमबीपीएस होईल. या ब्रॉडबँड प्लानमध्ये २४ तास अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंगचा फायदा मिळतो. तसेच, कंपनीच्या ५९९ रुपयांच्या फायबर बेसिक प्लानमध्ये ६० एमबीपीएसच्या स्पीडने ३३०० जीबी डेटा मिळतो. डेटा लिमिट समाप्त झाल्यानंतर २ एमबीपीएस स्पीडने इंटरनेट वापरू शकता. या प्लानमध्ये देशभरात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. हा प्लान फायबर बेसिकचा भाग आहे, त्यामुळे लाँग टर्मसाठी सबस्क्राइब करता येत नाही. या प्लान्ससाठी तुम्हाला मासिक सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल. बीएसएनएलचा ७४९ रुपये आणि ७९९ रुपयांचा प्लान बीएसएनएलकडे ७४९ रुपयांचा स्वस्त ब्रॉडबँड प्लान उपलब्ध आहे. या प्लानमध्ये १०० एमबीपीएसच्या स्पीडने एकूण १०० जीबी डेटा मिळतो. कंपनीच्या या प्लान्समध्ये मिळणाऱ्या अतिरिक्त बेनिफिट्सबद्दल सांगायचे तर यामध्ये सोनी लिव्ह प्रीमियम, झी५ प्रीमियम, वूट सिलेक्ट, बीएसएनएल सिनेमा+ आणि यप टीव्हीसह अनेक ओटीटी अॅप्सचा मोफत अॅक्सेस मिळेल. तसेच, कंपनीकडे ७९९ रुपयांचा प्लान देखील उपलब्ध आहे. या प्लानमध्ये १०० एमबीपीएसच्या स्पीडने एकूण ३३०० जीबी डेटा मिळतो. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/ohc0NrF