Full Width(True/False)

अरेच्चा! ऑनलाइन ऑर्डर केला दीड लाखाचा आयफोन, डिलिव्हरीमध्ये मिळालं नेहमीचंच हे स्वस्त प्रोडक्ट

नवी दिल्ली: आज ऑनलाइन शॉपिंगद्वारे घरपोच सर्व वस्तू मिळत असल्याने दुकानात जाऊन खरेदी करण्याची गरज भासत नाही. याशिवाय करण्याचे आणखी एक प्रमुख कारण म्हणजे प्रोडक्ट्सवर मिळणारे बंपर डिस्काउंट. ऑनलाइन खरेदी करताना महागड्या प्रोडक्ट्सवर बंपर डिस्काउंट, आकर्षक ऑफर्सचा लाभ मिळत असतो. मात्र, याच डिस्काउंटच्या नादात कधी कधी मोठे नुकसान देखील होते. अनेकदा वस्तू मागवलेली वेगळी असते व येते मात्र दुसरीच. असाच काहीसा प्रकार लंडन येथील एका महिलेबाबत घडला आहे. महिलेला आयफोनऐवजी चक्क साबणच पाठवला आहे. वाचा: लंडन येथील एका ३२ वर्षीय महिलेने १.५ लाख रुपयांचा ऑर्डर केला होता. मात्र, डिलिव्हरीत त्यांना स्मार्टफोनऐवजी चक्क साबण पाठवला आहे. रिपोर्टनुसार, Khaoula Lafhaily नावाच्या महिलेने अ‍ॅपल खरेदी केला होता. महिलेने स्काय मोबाइल टेलिकॉमकडून ३ वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टवर १५०० पाँडमध्ये (जवळपास १.५१ लाख रुपये) फोन खरेदी केला होता. फोनची डिलिव्हरी दोन दिवसांनंतर मिळाली. मात्र, पॅकेज उघडल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला. डिलिव्हरी करण्यात आलेल्या पॅकेजमध्ये आयफोनऐवजी चक्क हँड सोप होता, ज्याची किंमत फक्त १ डॉलर आहे. यानंतर महिलेने त्वरित Sky Mobile कडे याची तक्रार केली. मात्र, अद्याप महिलेला ऑर्डर केलेला फोन मिळालेला नाही. Lafhaily ने २४ जानेवारीला 13 Pro Max खरेदी केला होता व फोनच्या वन डे डिलिव्हरीसाठी पैसे देखील दिले. मात्र, कंपनीने सिंगल डे डिलिव्हरीमध्ये प्रोडक्ट दिले नाही. सोबतच, चुकीची वस्तू देखील पाठवली. स्काय मोबाइलने यावर म्हटले की, या प्रकरणाचा तपास केला जाईल. परंतु, एक आठवड्यानंतर देखील महिलेशी संपर्क केलेला नाही. दरम्यान, याआधी देखील अशा घटना समोर आलेल्या आहेत. फेब्रुवारी २०२१ मध्ये एका महिलेला आयफोन १२ प्रो मॅक्स ऐवजी थेट दही पाठवले होते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/NtJDcBV