नवी दिल्ली: भारत सरकारने पुन्हा एकदा ५४ मोबाइल अ‍ॅप्सला बॅन केले आहे. या बॅन केलेल्या नवीन अ‍ॅप्समध्ये चा देखील समावेश आहे. देशाच्या सुरक्षेसाठी धोका असल्याचे कारण देत सरकारने या अ‍ॅप्सला बॅन केले आहे. भारताची सुरक्षा, सार्वभौमत्व आणि अखंडतेला धोका असल्याचे कारण देत या अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. नवीन बॅन केल्या अ‍ॅप्समध्ये आधी बंदी घातलेल्या अ‍ॅप्सचा देखील समावेश आहे. मात्र, त्यांचे क्लोन पुन्हा प्ले स्टोरवर उपलब्ध झाले होते. दरम्यान, २०२० मध्ये देखील सरकारने जवळपास २०० पेक्षा अधिक चीनी अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. यानंतर आता सरकारने पुन्हा एकदा ५० पेक्षा अधिक अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. वाचा: रिपोर्टनुसार, इलेक्ट्रॉनिक आणि आयटी मंत्रालयाने () माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69 अंतर्गत या अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. हे अ‍ॅप्स चीनी कंपनी , यांच्याशी संबंधित आहे. रिपोर्टनुसार, हे अ‍ॅप्स भारतीयांचा डेटा चीन सारख्या देशात असलेल्या सर्व्हरवर ट्रान्सफर करत होते. तसेच, प्ले स्टोरवर देखील या ५४ अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. जून २०२० मध्ये भारत सरकारने २०० पेक्षा अधिक चीनी अ‍ॅप्सवर निर्बंध घातले होते. सरकारने पहिल्या टप्प्यात TikTok, Shareit, WeChat, Helo, Likee, UC News, Bigo Live, UC Browser, ES File Explorer आणि Mi Community सारख्या लोकप्रिय अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. सध्या बॅन केलेल्या अ‍ॅप्समध्ये २०२० मध्ये बंदी घातलेल्या बहुतांश अ‍ॅप्सचे रीब्रँडेड व्हर्जन आहे. ऑनरशिप लपवण्यासाठी या अ‍ॅप्सने आपले स्वरुप बदलले होते. आता बॅन केलेल्या ५४ चीनी अ‍ॅप्समध्ये Beauty Camera: Sweet Selfie HD, - Selfie Camera, Equalizer & Bass Booster, CamCard for SalesForce Ent, Isoland 2: Ashes of Time Lite, Viva Video Editor, Tencent Xriver, Onmyoji Chess, Onmyoji Arena, AppLock आणि Dual Space Lite सारख्या लोकप्रिय अ‍ॅप्सचा समावेश आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/CYweA05