Full Width(True/False)

ग्राहकांना पुन्हा एकदा झटका! इंटरनेट वापरणे होणार महाग, खिशावर पडणार भार

नवी दिल्ली: इतर अनेक देशांच्या तुलनेत भारतात स्वस्तात उपलब्ध आहे. ग्रामीण भागात देखील इंटरनेट सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न सरकार आणि टेलिकॉम कंपन्यांकडून केला जात आहे. मात्र, तुम्ही जर आतापर्यंत स्वस्त इंटरनेटचा आनंद घेत असाल तर लवकरच तुम्हाला इंटरनेटसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. रिपोर्टनुसार, पुढील काही महिन्यात इंटरनेटच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. किंमतीत २० टक्के वाढ होऊ शकते. अद्याप कोणत्याही इंटरनेट कंपनीने किंमती वाढवण्याचा निर्णय घेतलेला नाही. सध्या सर्वांच्या हातात स्मार्टफोन पाहायला मिळतो. तसेच, इंटरनेटचा वापर देखील वाढला आहे. अशा स्थितीमध्ये अनेकजण नियमित कॉलिंगऐवजी थेट इंटरनेटचा वापर करून कॉल करताना पाहायला मिळतात. वाचा: लोकांनी आता नियमित कॉलिंगचा वापर कमी केला आहे. कॉल ड्रॉप आणि नेटवर्कची समस्या असल्यामुळे अनेकजण इंटरनेटच्या माध्यमातून कॉलिंग करत असे. मात्र, आता बहुतांश लोक व्हॉट्सअ‍ॅप कॉल अथवा व्हॉट्सअ‍ॅप व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधत आहे. जवळपास ३० ते ४० टक्के लोक नियमित कॉलिंगऐवजी व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून संवाद साधत आहे व याची क्वालिटी देखील चांगली आहे. यामुळे इंटरनेटचा वापर देखील आधीपेक्षा वाढला आहे. आता कंपन्यांनी आधीपेक्षा जास्त इंटरनेट द्यावे लागत आहे. त्यामुळेच, पुढील काही महिन्यात टेलिकॉम कंपन्या इंटरनेटच्या कंमतीत वाढ करण्याची शक्यता आहे व ही वाढ जास्त असेल. दरम्यान, इंटरनेट प्लान्सच्या किंमती वाढवण्याची सध्या केवळ शक्यता वर्तवली जात आहे. कोणत्याही कंपनीने अधिकृतपणे याबाबत माहिती दिलेली नाही. परंतु, भविष्यात इंटरनेटच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. भारतात पुढील वर्षी ५जी कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार असल्याने, इंटरनेटच्या किंमती वाढणे जवळपास निश्चित आहे. या किंमतीत २० ते ३० टक्के वाढ पाहायला मिळेल. सोबतच, इंटरनेट स्पीड देखील आधीपेक्षा चांगला असेल. यामुळे कॉलिंगची समस्या समाप्त होईल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/UQWPXra