नवी दिल्ली: टेलिकॉम कंपन्या , आणि भारती एअरटेलकडे वेगवेगळ्या प्राइस रेंजमध्ये येणारे अनेक प्रीपेड प्लान्स उपलब्ध आहे. या प्लान्समध्ये मिळणारे बेनिफिट्स देखील वेगवेगळे आहेत. तुम्ही जर दिवसाला जास्त डेटा वापरत नसाल व केवळ कॉलिंगसाठी प्लान्स शोधत असाल तर कंपन्यांकडे कमी किंमतीत येणारे काही चांगले रिचार्ज आहेत. कंपन्यांकडे दररोज १ जीबी डेटा ऑफर करणारे काही शानदार प्लान्स उपलब्ध आहेत. या प्लानमध्ये डेटा, कॉलिंग, एसएमएससह अनेक बेनिफिट्स मिळतील. दररोज १ जीबी डेटा ऑफर करणारे रिलायन्स जिओ, वोडाफोन आयडिया आणि भारती एअरटेलच्या या स्वस्त प्लान्सविषयी जाणून घेऊया. वाचा: चा १४९ रुपयांचा प्लान जिओच्या १४९ रुपयांच्या प्लानची वैधता २० दिवस आहे. या प्लानमध्ये यूजर्सला एकूण २० जीबी डेटा मिळतो. डेटा लिमिट समाप्त झाल्यानंतर यूजर्स ६४ kbps च्या स्पीडने इंटरनेट वापरू शकतात. या प्लानमध्ये देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. याशिवाय १०० मोफत एसएमएस देखील मिळतील. या प्लानमध्ये ग्राहकांना मोफत जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ क्लाउड आणि जिओ सिक्योरिटी सारख्या जिओ अॅप्सचे सबस्क्रिप्शन मिळेल. याच बेनिफिट्ससह येणारे आणखी दोन प्लान्स कंपनीकडे आहेत. जिओच्या १७९ रुपयांच्या प्लानची वैधता २४ दिवस आणि २०९ रुपयांच्या प्लानची वैधता २८ दिवस आहे. एअरटेल, वीआय आणि बीएसएनएलचे स्वस्त प्लान्स एअरटेलकडे २०९ रुपयांचा प्लान असून, यामध्ये २१ दिवसांसाठी दररोज १ जीबी डेटा मिळतो. अशाप्रकारे प्लानमध्ये एकूण २१ जीबी डेटा, अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि १०० एसएमएसची सुविधा मिळते. तर च्या सर्वात स्वस्त १ जीबी डेटा प्लानची वैधता १९९ रुपये आहे. यामध्ये १८ दिवसांसाठी अनलिमिटेड वॉइस कॉलिंग, दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. प्लानमध्ये बिंज ऑल नाइटची सुविधा मिळते. कंपनीकडे याच बेनिफिट्स येणारे २१९ रुपये, २३९ रुपये आणि २६९ रुपयांचे प्लान्स देखील आहेत. सरकारी टेलिकॉम कंपनी कडे १५३ रुपयांचा प्लान आहे. या प्लानमध्ये २८ दिवसांसाठी दररोज १ जीबी डेटा, अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. कोणाचा प्लान बेस्ट जिओकडून सर्वात स्वस्त १४९ रुपयांचा प्लान ऑफर केला जातो. मात्र, BSNL चा दररोज १ जीबी डेटासह येणारा प्लान सर्वात फायद्याचा ठरतो. या प्लानची किंमत १५३ रुपये असून, यात २८ दिवसांसाठी दररोज २८ जीबी डेटा मिळतो. जर जिओच्या १४९ रुपयांच्या प्लानमध्ये २० दिवसांसाठी एकूण २० जीबी डेटा मिळतो. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/hivfI1Z