नवी दिल्ली: टेलिकॉम कंपनी आपल्या यूजर्ससाठी एकापेक्षा एक शानदार प्लान्स आणत असते. कमी किंमतीत जास्त फायदे देण्याचा कंपनीचा प्रयत्न असतो. प्रतिस्पर्धी कंपन्या , आणि बीएसएनएलच्या तुलनेत जिओकडे अनेक शानदार प्लान्स आहेत. कडे असा एक प्लान आहे, जो इतर कोणत्याच कंपनीकडे नाही. च्या २ हजार रुपयांपेक्षा कमी किंमती येणाऱ्या प्लानमध्ये डेटा, कॉलिंगचा तर फायदा मिळतोच. मात्र, या प्लानमध्ये कंपनी ४जी स्मार्टफोन देखील मोफत देत आहे. या प्लानची वैधता तब्बल दोन वर्ष आहे. इतर कोणतीच कंपनी आपल्या यूजर्सला असा प्लान ऑफर करत नाही. डेटा, कॉलिंगसह या प्लानमध्ये ४जी स्मार्टफोन फ्री मिळत असल्याने यूजर्ससाठी हा रिचार्ज नक्कीच फायद्याचा ठरतो. वाचा: Jio चा भन्नाट प्लान रिलायन्स जिओकडे कमी किंमतीत येणारे अनेक शानदार प्लान्स उपलब्ध आहेत. कंपनीकडे अगदी १४ दिवसांच्या वैधतेपासून ते वर्षभराच्या वैधतेसह येणारे प्लान्स आहेत. कंपनीकडे असाच १,९९९ रुपयांचा प्लान असून, याची वैधता दोन वर्ष आहे. १,९९९ रुपयांच्या प्लानमध्ये यूजर्सला देशभरात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. याशिवाय प्लानमध्ये ४८ जीबी हाय-स्पीड इंटरनेटची देखील सुविधा मिळते. जिओच्या या प्लानमध्ये तुम्हाला एसएमएस आणि ओटीटी बेनिफिट्सचा फायदा मिळणार नाही. परंतु, यात एक 4G Smartphone मोफत दिला जात आहे. या स्मार्टफोनविषयी सविस्तर जाणून घेऊया. प्लानमध्ये मोफत मिळेल ४G स्मार्टफोन रिलायन्स जिओच्या १,९९९ रुपयांच्या प्लानमध्ये डेटा, कॉलिंगसह ४जी स्मार्टफोन मोफत दिला जात आहे. या प्लानमध्ये तुम्हाला मोफत मिळेल. या स्मार्टफोनची किंमत २,९९९ रुपये आहे. JioPhone 4G मध्ये ड्यूल सिम सपोर्ट दिला असून, यात २.४ इंच QVGA डिस्प्ले मिळतो. तर पॉवर बॅकअपसाठी १,५०० एमएएचची बॅटरी दिली आहे. यात ९ तासांचा टॉकटाइम मिळतो. तसेच, एसडी कार्डच्या मदतीने स्टोरेजला १२८ जीबीपर्यंत वाढवू शकता. फोटोग्राफीसाठी यात फ्रंटला ०.३ मेगापिक्सल आणि रियरला ०.३ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. यात वॉइस असिस्टेंट सपोर्ट देखील मिळतो. दरम्यान, जिओच्या या खास ऑफरची माहिती कंपनीची वेबसाइट आणि अॅपवर देखील मिळेल. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Czpum81