Full Width(True/False)

जिओ लॅपटॉप सेगमेंटमध्ये घडवणार क्रांती, लवकरच येणार स्वस्तात मस्त JioBook; मोठी माहिती आली समोर

नवी दिल्ली : अनेक दिवसांपासून आपल्या लॅपटॉपवर काम करत आहे. लॅपटॉप्सशी संबंधित लीक्स याआधीही समोर आले आहेत. लॅपटॉप्सच्या अनेक फीचर्सचा खुलासा झाला आहे. जिओ लॅपटॉपची किंमत खूपच कमी असण्याची शक्यता आहे. लाँचनंतर हा शाओमी, डेल, लेनोवो आणि या सेगमेंटमधील अन्य लॅपटॉप्सला टक्कर देईल. एका रिपोर्टनुसार, आता लॅपटॉपच्या हार्डवेअरला परवानगी मिळाली आहे. यावरून लक्षात येते की लॅपटॉप लवकरच बाजारात एंट्री करण्याची शक्यता आहे. टिप्स्टर मुकुल शर्माने याच्या लिस्टिंगबाबत माहिती दिली आहे. यानुसार, लॅपटॉप आउट-ऑफ-द-बॉक्स Windows १० OS वर काम करेल. याचा प्रोडक्ट आयडी ४००८३००७८ आहे. सध्या लॅपटॉपचा अन्य स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झालेला नाही. वाचा: वेंडरकडून खरेदी करून स्वतःच्या ब्रँडिंग अंतर्गत होणार विक्री लिस्टिंगमध्ये कंपनीचे नाव Emdoor Digital Technology Co LTD असे दाखवण्यात आले आहे. याचा अर्थ वेंडरकडून प्रोडक्ट खरेदी करून, स्वतःच्या ब्रँडिंग अंतर्गत विक्री करण्याची शक्यता आहे. लॅपटॉप लेटेस्ट विंडोज ११ ओएसवर काम करेल. अंतिम प्रोडक्टमध्ये लेटेस्ट ओएस दिला जाण्याची शक्यता आहे. जिओचा हा लॅपटॉप JioBook नावाने सादर केला जाऊ शकतो. याला BIS सर्टिफिकेशन मिळाले असून, गीकबेंच बेंचमार्किंग अ‍ॅप्लिकेशनवर देखील पाहण्यात आले आहे. यावरून लॅपटॉपच्या काही प्रमुख स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळते. जिओबुकचे संभाव्य फीचर्स लिस्टिंगनुसार, लॅपटॉपमध्ये अँड्राइड ११ ओएस देण्यात आले आहे. मात्र, विक्रीच्या वेळी लॅपटॉपमध्ये एक वेगळे व्हर्जन मिळण्याची शक्यता आहे. सध्या हे टेस्टिंग फेजमध्ये असेल. लॅपटॉपने सिंगल-कोर टेस्टमध्ये १,१७८ आणि मल्टी-कोर टेस्टमध्ये ४,२४६ स्कोर मिळवला होता. जिओबुकमध्ये मीडियाटेक MT८७८८ चिपसेट दिला जाऊ शकतो. यासोबत २ जीबी रॅम देखील मिळेल. लॅपटॉपच्या अन्य स्पेसिफिकेशन्सबाबत अद्याप खुलासा झालेला नाही. कंपनीने देखील अद्याप लाँच तारखेबाबत देखील कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतु, लवकरच लॅपटॉपच्या अन्य स्पेसिफिकेशन्स आणि लाँच तारखेबाबत माहिती समोर येण्याची शक्यता आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/lESNpVP