Full Width(True/False)

६० मेगापिक्सल सेल्फी कॅमेऱ्यासह Moto चा शानदार स्मार्टफोन भारतात लाँच, खरेदीवर जिओ यूजर्सला मिळेल १० हजार रुपयांचा फायदा

नवी दिल्ली: मोटोरोलाने भारतात आपला नवीन Moto Edge 30 Pro ला लाँच केले आहे. हा फ्लॅगशिप फोन गेल्यावर्षी लाँच केलेल्या एड्ज २० प्रो चा सक्सेसर आहे. मध्ये १४४ हर्ट्जसह येणारा डिस्प्ले, ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ६८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला असून, हा वॉटर रेपेलेंट बिल्ड आहे. यामध्ये 'रेडी फॉर' नावाचे एक फीचर दिले असून, याच्या मदतीने यूजर्स मोबाइल अ‍ॅपला मोठ्या स्क्रीनवर अ‍ॅक्सेस करू शकतात. तसेच, विडोंज ११ लॅपटॉपवर होणाऱ्या व्हिडिओ कॉन्फ्रेंससाठी फोनचा वेबकॅम म्हणून वापर करू शकतात. Motorola Edge 30 Pro स्मार्टफोन Asus ROG Phone 5s, Vivo X70 Pro आणि iQoo 9 या हँडसेटला टक्कर देईल. या फोनच्या किंमत आणि फीचर्सविषयी जाणून घेऊया. वाचा: Moto Edge 30 Pro ची किंमत Edge 30 Pro च्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ४९,९९९ रुपये आहे. हा फोन एकाच व्हेरिएंटमध्ये येतो. फोनला कॉसमॉस ब्लू आणि स्टारडस्ट व्हाइट रंगात खरेदी करू शकता. डिव्हाइसला ४ मार्चपासून फ्लिपकार्ट आणि प्रमुख रिटेल स्टोर्सच्या माध्यमातून खरेदी करू शकता. Motorola Edge 30 Pro च्या लाँच ऑफरबद्दल सांगायचे तर Flipkart वर फोनला SBI कार्डद्वारे खरेदी केल्यास ५ हजार रुपये फ्लॅट डिस्काउंट आणि रिटेल स्टोरवर ५ हजार रुपये कॅशबॅक मिळेल. याशिवाय जिओ यूजर्सला १० हजार रुपयांचे कॅशबॅक देखील मिळतील. फोनला Axis, HDFC, ICICI अथवा SBI च्या क्रेडिट कार्डचा वापर करून ९ महिन्यांच्या नो कॉस्ट ईएमआयवर खरेदी करू शकता. Moto Edge 30 Pro चे स्पेसिफिकेशन्स ड्यूल सिम (नॅनो) सपोर्टसह येणारा हा फोन अँड्राइड १२ वर काम करतो. यामध्ये ६.७ इंच फुल एचडी+ पोलेड डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १०८०x२४०० पिक्सल, आस्पेक्ट रेशियो २०:९, रिफ्रेश रेट १४४ हर्ट्ज आणि डीसीआय-पी ३ कलर आहे. डिस्प्लेला २.५डी कर्व्ड कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ३ सह अँटी-फिंगरप्रिंट कोटिंगने सुरक्षित केले आहे. यात स्नॅपड्रॅगन ८ झेन १ SoC सह ८ जीबी LPDDR५ रॅम मिळते. Moto Edge 30 Pro मध्ये फोटोग्राफीसाठी रियर कॅमेरा सेटअप दिला असून, यात ५० मेगापिक्सल मुख्य सेंसर, ५० मेगापिक्सल अल्ट्रा वाइड शूटर आणि २ मेगापिक्सल डेप्थ सेंसर आहे. तसेच, रियरला ड्यूल एलईडी प्लॅश मिळतो. फोन २४ fps वर ८के व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकतो. सेल्फीसाठी यात ६० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. Moto Edge 30 Pro मध्ये डॉल्बी एटमॉससह ड्यूल स्टीरियो स्पीकर दिले आहे. यात तीन मायक्रोफोनचा समावेश आहे. तसेच, वॉटर रेपेलेंट बिल्डसाठी याला आयपी५२ रेटिंग मिळाले आहे. पॉवर बॅकअपसाठी यात ६८ वॉट टर्बोपावर फास्ट वायर्ड चार्जिंगसह ४८०० एमएएचची बॅटरी दिली आहे. फोन १५ मिनिटात शून्यावरून ५० टक्के चार्ज होते. यात १५ वॉट वायरलेस चार्जिंग आणि ५ वॉट वायरलेस पॉवर शेअरिंग देखील आहे. वाचा: वाचा वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/7pOqBgz