मुंबई- नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' सिनेमा कोणीही विसरलं नसेलच. सिनेमामुळे एका रात्रीत स्टार होणं म्हणजे काय याची अनुभूती रिंकू राजगुरु आणि यांनी घेतली होती. ऑनर किलिंगसारख्या नाजुक विषयावर बेतलेल्या या सिनेमाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. या सिनेमाचा बॉलिवूडमध्ये हिंदी रिमेकही करण्यात आला. ज्यातून ईशान खट्टर आणि जान्हवी कपूर यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पण सडकला जेवढी लोकप्रियता मिळाली नाही त्याहून कैकपटीने जास्त सैराट हिट झाला होता. रिंकू आणि आकाशला आजही अनेकजण सैराटची हिट जोडी आर्ची आणि परश्या याच नावाने ओळखतात. नुकतेच ते डिनरसाठी एकत्र भेटले होते. विशेष म्हणजे दोघांनी पांढऱ्या रंगाचेच कपडे घातले होते. त्यांच्या या डिनर डेटचे काही फोटो आकाशने इन्स्टा स्टोरीवर शेअर केले होते. हे फोटो पाहून ते एकमेकांना डेट तर करत नाहीत ना अशा चर्चा आता नेटकऱ्यांमध्ये रंगू लागल्या आहेत. आकाशने पांढरा स्वेटशर्ट आणि निळ्या रंगाची डेनिम घातली होती. लांब केस आणि दाढीमधला आकाशचा लुक फारच लक्षवेधी होता. तर रिंकूनेही पांढऱ्या रंगाचा स्वेटशर्ट आणि पॅन्ट घातली होती. आर्ची आणि परश्याने त्यांचे फोटो शेअर करताच त्यांच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दलची अटकळे सुरू झाली. फोटोंमध्ये, रिंकू आणि आकाश दोघंही सेल्फी घेण्यासाठी आरशासमोर पोज देताना दिसत आहेत. दोघंही एकमेकांसोबत प्रचंड आनंदी दिसत आहेत. आकाशने इन्स्टाग्रामवर स्टेटसमध्ये त्यांचे फोटो शेअर केले होते. रिंकूने फोटो शेअर करत लिहिले होते की, जेवण खूप जास्त झालं आता उद्या जास्तवेळ कार्डिओ करावं लागेल. ते दोघं एकत्र किती गोड दिसतात हे काही वेगळं सांगायला नको.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/L5WumesB2