ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर Mobile Savings Days सेल सध्या सुरू आहे. या दरम्यान स्मार्टफोन आणि मोबाइल एक्सेसरीजवर ४० टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. Amazon चा हा सेल १९ मार्चपर्यंत चालणार आहे. तुम्ही जर नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा सेल तुमच्या फायद्याचा ठरेल. या सेलमध्ये तुम्ही काही दिवसांपूर्वीच लाँच झालेला OnePlus Nord CE 2 5G आणि iQoo 9 Pro 5G सह Samsung Galaxy M32 5G, Mi 11X, Xiaomi 11 Lite NE 5G, Redmi Note 11T 5G, Redmi Note 10S, Redmi Note 10T 5G, OnePlus Nord 2 5G और OnePlus 9RT सारखे स्मार्टफोन्स स्वस्तात उपलब्ध मिळत आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन ४० टक्के डिस्काउंटसह उपलब्ध आहेत. तसेच, बँक आणि एक्सचेंज ऑफरचा देखील फायदा मिळेल.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/z48Tho3