नवी दिल्ली : ने भारतात आपल्या सर्वात स्वस्त ला लाँच केले आहे. Apple ने ला लाँच केले असून, याचे डिझाइन २०२० मध्ये लाँच केलेल्या iPhone SE सारखे आहेत. डिझाइन जरी जुने असले तरीही Apple ने या फोनमध्ये iPhone 13 सीरिजच्या स्मार्टफोनमध्ये मिळणारा प्रोसेसर दिला आहे. हा फोन जुन्या मॉडेलपेक्षा थोडा महाग आहे. परंतु, या फोनच्या लाँचिंगनंतर Apple ने अधिकृतपणे जुन्या SE मॉडेलला बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हे मॉडेल आता Apple India च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. मात्र, फोनला आताही फ्लिपकार्ट आणि ऑनलाइन स्टोरवरून खरेदी करता येईल. वाचा: iPhone SE 2020 ची भारतातील किंमत Apple ने iPhone SE 2020 ला भारतात अधिकृतरित्या बंद केले आहे. मात्र, तरीही फोन खरेदीसाठी उपलब्ध आहे. तुम्ही या स्मार्टफोनला ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. फोनच्या ६४ जीबी स्टोरेज मॉडेलसाठी तुम्हाला २९,९९९ रुपये खर्च करावे लागतील. iPhone SE 3 लाँच झाल्यानंतर iPhone SE 2020 ची किंमत कमी होण्याची शक्यता होती. मात्र, अद्याप किंमत कमी झालेली नाही. फोनचे १२८ जीबी मॉडेल ३४,९९९ रुपये आणि २५६ जीबी मॉडेल ४४,९९९ रुपयात उपलब्ध आहे. सध्या iPhone SE 2020 व्हेरिएंट हे भारतातील सर्वात स्वस्त मॉडेल आहे. iPhone SE 2022 चे फीचर्स iPhone SE 3 फोनला A१५ बायोनिक प्रोसेसरसह सादर करण्यात आले आहे. यामध्ये १२ मेगापिक्सलचा वाइड कॅमेरा दिला आहे. फोटोग्राफीसाठी यात स्मार्ट एचडीआर ४, फोटोग्राफिक स्टाइल, डीप फ्यूजन आणि पोर्ट्रेट मोड सारखे खास फीचर्स दिले आहेत. iPhone SE मध्ये यूजर्सला नाइट मोड मिळत नाही. आयफोन एसई ३ आयओएस १५ वर काम करतो. यामध्ये ४.७ इंच रेटिना एचडी डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन ७५०x१३३४ पिक्सल आहे. स्मार्टफोनमध्ये पुढील व मागील पॅनेलवर ग्लास प्रोटेक्शन दिले आहे. फोन ६०fps पर्यंत ४के व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो. याशिवाय iPhone SE (2022) मध्ये फ्रंटला ७ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. कंपनीने या फोनला ६४ जीबी, १२८ जीबी आणि २५६ जीबी मॉडेला स्टारलाइट आणि रेड कलरमध्ये लाँच केले आहे. या फोनची सुरुवाती किंमत ४३,९०० रुपये असून, ग्राहक फोनला ११ मार्चपासून प्री-ऑर्डर करू शकतात. हा फोन १८ मार्चपासून बाजारात उपलब्ध होईल. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/udNeQOV