Full Width(True/False)

'काचा बादाम' गायक Bhuban Badyakar ने अपघातावर रचलं नवं गाणं

मुंबई- '' गाणं गाऊन शेंगदाणे विकणारे एका रात्रीत स्टार झाले. भुबन आता त्यांच्या नवीन गाण्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अलीकडेच भुबन यांचा अपघात झाला होता. भूबन त्यांची नवीन गाडी चालवायला शिकत असताना हा अपघात झाला. यावेळी भुवन यांच्या छातीला दुखापत झाली होती. योग्य उपचारांनी भुबन आता पूर्णपणे बरे झाले असून नुकतंच त्यांनी एक नवीन गाणंही रचलं. त्यांचं हे नवीन गाणं सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. विशेष म्हणजे भुबन यांचं हे व्हायरलं होणारं गाणं यांनी त्याच्या अपघातावर बनवलं आहे. या गाण्याचं नाव आहे 'अमार नूतन गाडी' म्हणजेच 'माझी नवी गाडी.' या गाण्यात भुबनने त्यांच्या अपघाताची संपूर्ण गोष्ट सांगितली आहे. देवाने त्यांना कसं वाचवलं हेदेखील त्यांनी यात सांगितलं. पश्चिम बंगालमध्ये राहणारे भुबन बादायकर 'काचा बादाम' गाणं गाऊन शेंगदाणे विकून उदरनिर्वाह करायचे. एकदा ते 'काचा बादाम' गात असताना कोणीतरी त्यांचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर शेअर केला. बघता बघता हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि भुबन हे इंटरनेट सेन्सेशन बनले. भुबन यांच्या 'कच्चा बदाम'वर आजही अनेक इन्स्टाग्राम रील्स बनवले जातात. त्यांनी एका म्युझिक कंपनीसोबत हे गाणं रेकॉर्डही केलं आहे, ज्यासाठी त्यांना ३ लाख रुपये मिळाले. त्याचवेळी पश्चिम बंगालच्या पोलिसांनीही भुबन बादायकर यांचा गौरव केला आहे. अलीकडेच भुबनने एका मोठ्या हॉटेलमध्येही परफॉर्म केल होतं, ज्याचा व्हिडिओ पाहून चाहत्यांनी त्यांचं कौतुक केलं. भुबनने यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, आता ते शेंगदाणे विकणार नाही कारण ते प्रसिद्ध झाले आहेत आणि आता ते आणखीन व्हायरल व्हिडिओ बनवण्यावर लक्ष केंद्रित करणार आहेत. त्यांनी सांगितलं की त्यांना मुंबई आणि बांग्लादेशमधून अनेक ऑफर येत आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/FjCsmE0