मुंबई- छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री चारू असोपाने सुष्मिता सेनचा भाऊ सोबत ७ जून २०१९ रोजी लग्न केलं. गेल्या वर्षी त्यांना मुलगीही झाली. चारू, राजीव सोशल मीडियावर सक्रिय आहेत आणि मुली सोबतचे अनेक फोटो शेअर करत असतात. सगळं काही निट सुरू आहे असं वाटत असताना आता ते विभक्त होत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. राजीवने त्याच्या युट्यूब चॅनेलवर मुली झियानाचा फोटो शेअर केला होता. यासोबतच त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की, तो खुप दिवसांपासून आपल्या लहान मुलीला भेटू शकला नाही. नेमकी याचमुळे चारू आणि राजीव विभक्त होत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. राजीवने लिहिलं की, 'झियाना तुझ्या बाबांच्या घरी परत ये, इतका प्रवास करणं तुझ्यासाठी सुरक्षित नाही. 'खूप दिवसांपासून तुला पाहिलं नाही. लवकर ये आणि माझ्यासोबत खेळ.' राजीवच्या या पोस्टनंतर, चारूला विचारण्यात आलं की, तिच्या वैवाहिक जीवनात अडचणीची बातमी खरी आहे की नाही? त्यावेळी ती सुरुवातीला काहीच बोलली नाही पण नंतर ती म्हणाली, 'मला सध्या यावर काही बोलायचं नाही.' यापूर्वी एका वेबसाइटने चारू आणि राजीव गेल्या काही महिन्यांपासून वेगळे राहत असल्याची बातमी प्रसिद्ध केली होती. हाती आलेल्या माहितीनुसार चारू सध्या तिच्या मुलीसोबत तिच्या मूळ गावी बिकानेरमध्ये राहत आहे, तर राजीव मुंबईत राहत आहे. अलीकडेच, महाशिवरात्री साजरी करत चारूने मुलगी जियानासोबत एका मंदिरातला फोटो शेअर केला होता. तिने फोटोला 'ओम नमः शिवाय' असं कॅप्शन दिलं होतं. अभिनेत्रीने आणखी काही फोटो शेअर करत लिहिलं, 'महाशिवरात्री आली, सुख घेऊन आली. माझ्या बाळाला चार महिन्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. या जगातल्या कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त मी तुझ्यावर प्रेम करते.'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/uajSXYw