Full Width(True/False)

यूपीत भाजप आघाडीवर , तर सोशल मीडियावर नेटकरी ...भन्नाट मीम्स व्हायरल

मुंबई: देशातील पाच राज्यांच्या विधानसभांचा निकाल आज, गुरुवारी (१० मार्च) जाहीर होत आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांतील नागरिकांचा मतकौल आज स्पष्ट होईल. उत्तर प्रदेशसह सर्वच राज्यांच्या निकालावर पुढील राजकीय गणिते ठरणार असल्यामुळं या निकालांकडं लक्ष आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू झाली असून यूपीत सर्व प्रथम पोस्टल मतांची मोजणी करण्यात येत आहे. सकाळी ८ ते ९ वाजेपर्यंतच्या एका तासाचे कल समोर आले असून या मतमोजणीसाठी भाजप आणि मित्रपक्ष आघाडीवर आहेत.पहिल्या तासांत भाजपनं मारलेल्या या मुसंडीनंतर सोशल मीडियावर देखील विविध प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. नेटकऱ्यांनी मजेशीर मीम्स शेअर करत भाजपच्या आघाडीचं स्वागत केलं आहे. यूपी निवडणुकीच्या मतमोजणीत सकाळी ९ वाजेपर्यंतचा कल बघितल्यास भाजप १७६ जागांवर आघाडीवर आहे. तर समाजवादी पक्ष ९९ जागांवर पुढे आहे. बहुजन समाज पक्ष ६ आणि काँग्रेस ४ जागांवर आघाडीवर आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/XbghkuM