मुंबई : अभिनेत्री हिचे सासरे हरीश अहुजा यांची २७ कोटी ६१ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे.या प्रकरणी फरिदाबाद पोलिसांच्या सायबर विभागानं चार राज्यांमधून केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनेत्री सोनम कपूर हिच्या सासऱ्यांच्या शाही एक्स्पोर्ट फॅक्टरी या आयात-निर्यात करणाऱ्या कंपनीची फसवणूक केली आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात याप्रकरणी तक्रार दाखल झाली होती. तेव्हापासून फरिदाबाद पोलिसांची एक टीम याचा तपास करत होती. याप्रकरणी दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कर्नाटकमधून नऊ आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये माजी लिपिक आणि परदेशी व्यापार महासंचालनालयाच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. मनोज राणा, मनीष कुमार, प्रवीण कुमार, ललित कुमार जैन, मनीष कुमार मोगा, भुसन किशन ठाकूर, सुरेश कुमार जैन, गणेश परशुराम, राहुल रघुनाथ आणि संतोष सीताराम अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. फरिदाबादचे पोलिस उपायुक्त नितीश अग्रवाल यांनी सांगितलं की, 'सरकार निर्यात कंपन्यांना आरओएससीटीएल परवान्यांच्या स्वरूपात काही इन्सेन्टिव्ह देते. यामुळे त्यांना उत्पादन शुल्क आणि सीमा शुल्कात काही सूट मिळू शकते. हे आरओएससीटीएल परवाने काही लाख रुपयांच्या डिजिटल कुपनसारखे असतात. आरोपी मनोजनं कंपनीसाठी खोटी १५४ डिजिटल कुपन्स तयार केली. त्यानंतर त्यांनी इतर आरोपींच्या मदतीनं आहुजा यांच्या शाही कंपनीमधून २७.६१ कोटी रुपये ट्रान्सफर केले.' दरम्यान, सोनमनं २०१८ मध्ये हरीश यांचा मुलगा आनंद आहुजाशी लग्न केलं. लग्नापूर्वी हे दोघं काही वर्ष एकमेकांना डेट करत होते. भाने नावाचा फॅशन ब्रँड चालवण्याव्यतिरिक्त, आनंद त्याच्या वडिलांच्या कंपनीत संचालकदेखील आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/XLCKHMS