Full Width(True/False)

'स्तनाचा आकार किती?' अभिनेत्री त्यांच्या ब्रेस्ट साइजमुळे झाल्या ट्रोल

मुंबई- अनेक लोकप्रिय टीव्ही शोचा भाग असलेली अभिनेत्री सायंतनी घोषने अलीकडेच खुलासा केला की तिला तिच्या स्तनाच्या आकारावरून अनेकदा नकारात्मक कमेन्ट ऐकाव्या लागल्या. लोकांनी तिची निंदा करण्यात कोणतीच कसर सोडली नाही. सायंतनी याआधीही अनेक अभिनेत्री बॉडी शेमिंगच्या शिकार झाल्या आहेत. अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांच्या स्तनाच्या आकारामुळे युझर्सनी अश्लील कमेन्ट केल्या. सायंतनी घोषने 'संजीवनी', 'नागीन' सारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं. अलीकडेच एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीला सुरुवातीपासूनच बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला असल्याचं सांगितलं. सायंतनीच्या म्हणण्यानुसार, एकदा एका महिलेने तिला सांगितलं होतं की तिच्या स्तनाच्या आकारामुळे ती खूप सेक्सी दिसते. तर एकदा सोशल मीडियावरील युझरने तिला तिच्या स्तनाचा आकार विचारला होता. यावर प्रतिक्रिया देत सयांतनी म्हणाली की, 'कधीकधी अशा गोष्टी खूप घाबरवतात. कोणत्याही प्रकारची बॉडी शेमिंग वाईट असतं.' छोट्या पडद्यावरील लोकप्रिय हिंदी मालिका 'अनुपमा' मध्ये दिसणारी अभिनेत्री अनेरी वजानीने काही वर्षांपूर्वी इन्स्टाग्रामवर स्वतःचा बिकनीतला एक फोटो शेअर केला होता. त्यावेळी काही युझर्सने तिच्या स्तनाच्या आकाराबद्दल अश्लील कमेंट्स केल्या होत्या आणि तिला 'कुपोषित' देखील म्हटलं होतं. तेव्हा अनेरीने त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं होतं. अनेरी याआधी 'बेहद', 'सिलसिला बदलते रिश्तों का' आणि 'निशा और उसके कजिन्स' सारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. रिताशा राठौर 'बधो बहू' या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रिताशा राठौरला सर्वात जास्त बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला होता. रिताशाने अनेकदा बॉडी शेमिंगबद्दल भाष्य केलं आहे. रिताशा अनेकदा तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. एकदा तिने तिचे न्यूड फोटोशूट शेअर केल होत, ज्यामुळे ती काही यूजर्सच्या निशाण्यावर आली होती. रिताशा म्हणाली होती की, तिला फक्त लोकांना सांगायच आहे की त्यांनी त्यांच्या शरीरावर प्रेम केल पाहिज. शरीर जसे आहे तसंच त्याचा स्वीकार करावा. एकदा रिताशा राठौरने इन्स्टाग्रामवर ब्रा आणि ब्रेस्ट घालण्याबद्दल एक लांबलचक पोस्ट लिहिली होती. सलोनी चोप्राअभिनेत्री सलोनी चोप्रा देखील अनेकदा बॉडी शेमिंगचा शिकार झाली आहे. यासाठी तिने वेळोवेळी सडेतोड उत्तरंही दिली आहेत. २०१६ मध्ये, सलोनीने #FreeTheNipple चळवळीत भाग घेतला आणि इन्स्टाग्रामवर याबद्दल एक पोस्ट शेअर केली. यामध्ये सलोनीने लिहिलं होतं की, जर पुरुष सार्वजनिक ठिकाणी छाती दाखवू शकतात, तर महिला ब्रा का दाखवू शकत नाहीत? सलोनीने पोस्टमध्ये लिहिलं की, ती तिची ब्रा दाखवेल आणि त्यात तिला कोणतीही लाज वाटत नाही. अभिनेत्री शमा सिकंदरचा देखील या यादीत समावेश आहे. शमा सोशल मीडियावर सक्रिय असते, तसंच अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. शमाने एकदा एक फोटो शेअर केला होता, ज्यावर वाईट पद्धतीने युझर्सनी कमेंट केली होती. त्यानंतर शमाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहून युझर्सला फटकारले होते. शमाने लिहिलं, 'स्त्रीला स्तन असतात आणि यामुळेच ती पुरुषांपेक्षा वेगळी ठरते. मी लकी आहे की मी एक स्त्री आहे आणि मला स्तन आहेत. जे लोक माझ्या शरीराच्या अवयवांना वेगवेगळी नावं देतात, त्यांना हे करणं थांबवून त्यांच्या आयुष्यात पुढे जाण्याची वेळ आली आहे.' प्रसिद्ध अभिनेत्री दिव्या दत्तालाही बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला आहे. एकदा दिव्याने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केल्यावर काही युझर्सनी तिच्या स्तनाच्या आकाराबद्दल कमेंट करायला सुरूवात केली. त्यानंतर दिव्याने त्या युझर्सना असं उत्तर दिलं की ती लोक पुन्हा तिला बोललेच नाहीत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/9Aug1F7