Full Width(True/False)

Viral Video- 'द काश्मीर फाइल्स' पाहून लालकृष्ण अडवाणी रडले!

मुंबई- विवेक अग्निहोत्रीचा '' हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात दिग्दर्शकाने काश्मिरमधला १९९० चा काळ दाखवला आहे. त्यावेळच्या काश्मिरी पंडितांच्या वेदना दाखवण्यात आल्या आहेत. या चित्रपटात अशा अनेक घटना पाहून प्रेक्षक विचारात पडले आहेत. चित्रपट पाहिल्यानंतर सर्वांचेच डोळे ओले झाले आहेत. सोशल मीडियावर प्रत्येकजण चित्रपटाबद्दल आपापली मतं मांडताना दिसत आहे. दुसरीकडे, अनेक व्हिडिओही समोर आले आहेत, ज्यामध्ये लोक आपल्या भावना व्यक्त करत आहेत. या सगळ्यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'द काश्मीर फाइल्स' पाहिल्यानंतर लालकृष्ण अडवाणी भावुक झाल्याचा दावा या व्हिडिओमध्ये केला जात आहे. पण या व्हिडिओचं सत्य काय आहे? हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत लालकृष्ण अडवाणी चित्रपट पाहताना दिसत आहेत. यादरम्यान ते रडताना दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना दावा करण्यात आला आहे की, 'द काश्मीर फाइल्स' पाहिल्यानंतर अडवाणींना वाईट वाटलं. व्हिडिओ शेअर करताना एका युझरने लिहिलं की, 'लालकृष्ण अडवाणी या वयातही 'द काश्मीर फाइल्स' चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात पोहोचले होते. कदाचित ते स्वतःच्या भावना आवरू शकले नाहीत आणि रडले. विचार करा की ती घटना किती भयंकर असेल, जे स्वतः काश्मिरी हिंदूंनी सहन केलं असेल.' काय आहे व्हिडिओमागचं सत्य? व्हायरल व्हिडिओत चित्रपट पाहून लालकृष्ण अडवाणी नक्कीच दु:खी झालेले दिसत आहेत. मात्र यात ते 'द काश्मीर फाइल्स' पाहत नाहीत. तर हा व्हिडीओ 'शिकारा' चित्रपटाच्या स्क्रीनिंग दरम्यानचा आहे. यात अडवाणींसोबत विधू विनोद चोप्रा देखील दिसत आहेत, ज्यांच्या दिग्दर्शनाखाली हा चित्रपट बनला आहे. हा चित्रपट ७ एप्रिल २०२० रोजी प्रदर्शित झाला होता. मात्र, हा चित्रपट फ्लॉप ठरला. 'द काश्मीर फाइल्स'चा बॉक्स ऑफिसवर दबदबा 'द काश्मीर फाइल्स' बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. हा चित्रपट पहिल्या दिवशी १.५० ते २ कोटींची कमाई करेल असा अंदाज होता. पण पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ४.५५ कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये १०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ७ कोटींहून अधिकची कमाई केली. म्हणजेच पहिल्या दिवसाच्या तुलनेत चित्रपटाने दुसऱ्या दिवशी दुप्पट कमाई केली आहे, जे हिंदी चित्रपटांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/MGH2dy6