Full Width(True/False)

चार वर्ष जुन्या प्रकरणात सोनाक्षी सिन्हा विरोधात वॉरन्ट जारी

मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री कायदेशीर अडचणीत आली आहे. पैसे घेऊनही कार्यक्रमाला न पोहोचल्याने सोनाक्षीविरोधात वॉरन्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील ACJM न्यायालयाने अभिनेत्रीविरुद्ध वॉरन्ट जारी केले असून तिला २५ एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. सोनाक्षी सिन्हा आणि तिच्या एका सहकाऱ्यावर फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पैसे घेऊनही सोनाक्षी कार्यक्रमात गेली नव्हती. त्यामुळे फेब्रुवारी २०१९ मध्ये तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून अभिनेत्री आणि तिच्या सहकाऱ्याविरुद्ध फसवणुकीचा खटला सुरू असून त्याची सुनावणी २५ एप्रिलला होणार आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, मुरादाबाद येथील शिवपुरी शहरात राहणारे प्रमोद शर्मा एक इवेन्ट कंपनी चालवतात. या कंपनीने २०१९ मध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात सोनाक्षी सिन्हा आणि तिच्याशी संबंधीत इतर कंपन्यांनी प्रमोद यांची ३७ लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी काटघर पोलिसांनी तपासाअंती सोनाक्षी आणि तिच्या सहकराऱ्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. सांगितलं जातं की सोनाक्षीने या कार्यक्रमासाठी २८ लाख १७ हजार रुपये घेतले होते, जे चार हप्त्यांमध्ये देण्यात आले होते. सोनाक्षीने या कार्यक्रमाच्या प्रमोशनचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला होता. मात्र त्यानंतर ती कार्यक्रमात गेलीच नाही. दरम्यान, सोनाक्षीच्या कामाबाबात बोलायच झालं तर ती 'काकुड़ा' आणि 'डबल XL' नावाच्या चित्रपटात काम करणार आहे. मागच्या वर्षी तिने अजय देवगन स्टारर 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' मध्ये एक छोटी भूमिका साकारली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/f3HaUTl