स्मार्टफोनप्रमाणेच आता भारतात Smart TV खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. अनेकजण आता स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याला प्राधान्य देत आहे. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे स्मार्ट टीव्हीची किंमत. बाजारात वेगवेगळ्या कंपन्यांचे अनेक स्मार्ट टीव्ही उपलब्ध आहेत, ज्यांची किंमत खूपच कमी आहे. अगदी १० हजार रुपयांच्या बजेटमध्ये देखील तुम्ही शानदार स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकता. तुम्ही जर नवीन टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बाजारात एकापेक्षा एक चांगले पर्याय उपलब्ध आहेत. ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon वर ३२ इंच स्क्रीनसह येणारे काही स्वस्त टीव्ही उपलब्ध आहेत. Amazon वरून तुम्ही VW, रेडमी, वनप्लस, Mi आणि एलजी सारख्या लोकप्रिय ब्रँड्सचे टीव्ही स्वस्तात खरेदी करू शकता. दमदार फीचर्ससह येणाऱ्या या स्मार्ट टीव्हींवरील ऑफर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/6L4iv2A