नवी दिल्ली: पूर्वीसारखे आता प्रत्येकाला ऑफिसमध्ये जाऊन काम करण्याची गरज उरली नसून लॉकडाऊन दरम्यान, अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना ची सुविधा दिली.अजून देखील कित्येक कर्मचारी घरूनच काम करत आहे . अशात सर्वात महत्वाचे ठरले ते लॅपटॉप आणि इंटरनेट कनेक्शन. या दोन गोष्टींवरच कंपन्यांचे काम व्यवस्थित सुरु आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. अशात जर तुम्हालाही घरातून काम करायचं असेल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमचा लॅपटॉप अगदी व्यवस्थित ठवणे आवश्यक आहे. याकरिता काही गोष्टींची काळजी घेणेआवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत. ज्या तुम्हाला तुमचा लॅपटॉप सुरक्षित ठेवण्यात मदत करेल. या टिप्स फॉलो केल्यास तुमचा लॅपटॉप वर्षानुवर्षे अगदी नीट काम करेल. पाहा या भन्नाट टिप्स. वाचा: मॅग्नेटिक डिव्हाइस : घरून काम करतांना अनेक युजर्स लॅपटॉपची हवी तशी आणि योग्य ती काळजी घेत नसल्याचे दिसून येते. जर तुम्हीही त्यापैकी असाल तर तर वेळीच सावध व्हा. अन्यथा तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. तुमच्याकडे डिव्हाइस असेल ज्यामध्ये Magnetic Power जास्त असेल तर अशा उपकरणांना नेहमी तुमच्या लॅपटॉपपासून दूर ठेवा. अशी उपकरणे तुमच्या लॅपटॉपचे अंतर्गत नुकसान करू शकतात. अनेक लोक लॅपटॉप वापरतांना योग्य ती काळजी घेत नाही आणि ही उपकरणे लॅपटॉपजवळ ठेवतात. या मॅग्नेटिक डिव्हाइसेसचा लॅपटॉपवर परिणाम होतो आणि लॅपटॉप पूर्णपणे खराब देखील होऊ शकतो. म्हणूनच जर तुम्हाला तुमचा लॅपटॉप सुरक्षित ठेवायचा असेल तर या गोष्टी नेहमी लॅपटॉपपासून दूर ठेवाव्यात. गरम वस्तू: वर्क फ्रॉम होम करत असतांना अनेकांना काम करतांनाच काही खाण्या-पिण्याची सवय असते. अशात अनेक युजर्स चहाचा काप किंवा इतर काही गरम वस्तू लॅपटॉप जवळ ठेवतात. तुम्हालाही तुमच्या लॅपटॉपभोवती काही गरम वस्तू ठेवण्याची तुम्हाला सवय असेल, तर, तसे करणे लगेच थांबवा. बरेच वेळा लोक लॅपटॉपवर खाद्यपदार्थ ठेवतात किंवा लॅपटॉपच्या आसपास काही अशी काही डिव्हाइसेस ठेवतात जी खूप गरम असतात. पण, अशा वेळी हे माहित असणे देखील आवश्यक आहे की, याचा लॅपटॉपवर वाईट परिणाम होऊ शकतो किंवा त्याचे भाग खराब होऊ शकतात. योग्य टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमचा लॅपटॉप दीर्घकाळ सुरक्षित ठेवू शकता. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/hfOl5Dq