आजपासून (२६ मार्च) IPL 2022 सुरू होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून क्रिकेट चाहते आयपीएल सुरू होण्याची वाट पाहत आहे. आपल्या आवडत्या खेळाडू आणि संघाला पुन्हा एकदा मैदानावर खेळताना पाहण्याची सर्वांनाच आतुरता आहे. जवळपास पुढील दोन महिने क्रिकेट चाहत्यांसाठी ही पर्वणी असणार आहे. तुम्ही आयपीएलचा आनंद टीव्हीवर तर घेऊ शकताच, मात्र तुम्हाला फोनवर देखील मोफत मॅच पाहता येईल. अनेक टेलिकॉम कंपन्या आपल्या रिचार्ज प्लानमध्ये मोफत Disney+Hotstar चे सबस्क्रिप्शन देत आहे. त्यामुळे तुम्हाला कोठुनही घरबसल्या आयपीएलचा आनंद घेता येणार आहे. यातच आता देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स Jio ने आयपीएल सुरू होण्याआधी खास Cricket Add-On Prepaid Plan लाँच केला आहे. यामुळे तुम्ही खूपच कमी किंमतीत आयपीएलचा आनंद घेऊ शकता. या प्लान्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/O5tVbfQ