नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी ला आपल्या स्वस्त प्रीपेड प्लान्समध्ये ग्राहकांची पसंती मिळते. कंपनीचे सध्या ४० कोटींपेक्षा अधिक यूजर्स आहेत. तसेच, कंपनीकडे एकापेक्षा एक शानदार बेनिफिट्स देणारे प्रीपेड, पोस्टपेड आणि ब्रॉडबँड प्लान देखील आहेत. कंपनीकडे २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणारे काही शानदार प्लान्स उपलब्ध आहेत. या प्लानमध्ये यूजर्सला इतर कंपनीच्या तुलनेत अधिक बेनिफिट्स मिळतात. तुम्हाला जर दररोज १ जीबी डेटा पुरेस असेल, तर कंपनीकडे काही चांगले प्लान्स उपलब्ध आहेत. २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत डेटा, कॉलिंगची सुविधा देणाऱ्या या प्लान्सविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: रिलायन्स जिओचा १४९ रुपयांचा प्रीपेड प्लान रिलायन्स जिओकडे १४९ रुपयांच्या किंमतीत येणारा शानदार प्लान उपलब्ध असून, यात दररोज १ जीबी डेटा मिळतो. या प्लानची वैधता २० दिवस आहे. म्हणजेच, प्लानमध्ये एकूण २० जीबी डेटाचा फायदा मिळतो. याशिवाय, देशभरात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची देखील सुविधा मिळते. एसएमएस बद्दल सांगायचे तर यात दररोज १०० एसएमएसचा फायदा मिळतो. अतिरिक्त बेनिफिट्सबद्दल सांगायचे तर यात , , आणि सारख्या अॅप्सचे सबस्क्रिप्शन मिळेल. हा कंपनीचा दररोज १ जीबी डेटा ऑफर करणारा सर्वात स्वस्त प्लान आहे. Jio चा १७९ रुपये आणि २०९ रुपयांचा प्लान जिओच्या १७९ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज १ जीबी डेटा मिळतो. या प्लानची वैधता २४ दिवस आहे. याशिवाय, प्लानमध्ये देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. तसेच, दररोज १०० मोफत एसएमएस देखील मिळतात. या प्लानमध्ये JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud सारख्या जिओ अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. कंपनीकडे २०९ रुपयांचा देखील प्लान उपलब्ध आहेत. यामध्ये दररोज १ जीबी डेटा मिळतो. या प्लानची वैधता २८ दिवस आहे. याशिवाय, देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० मोफत एसएमएसची देखील सुविधा मिळते. या प्लानमध्ये देखील तुम्हाला JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud सारख्या जिओ अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/hQqjNsz