नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओला आपल्या ग्राहकांना दमदार आणि स्वस्त प्लान्ससाठी ओळखले जाते. मात्र, आपल्या ग्राहकांना कमाई करण्याची देखील संधी देत आहे. तुम्ही जर जिओ यूजर्स असाल तर घरबसल्या कमाई करू शकता. जिओच्या या सर्विसचे नाव असे आहे. हे एक जिओ अॅप असून, सध्या केवळ अँड्राइड फोन्ससाठी उपलब्ध आहे. या अॅपला तुम्ही गुगल प्ले स्टोरवरून मोफत डाउनलोड करू शकता. POS Lite हे एक कम्यूनिटी रिचार्ज अॅप आहे. या अॅपच्या माध्यमातून इतरांचे रिचार्ज केल्यास तुम्हाला कमिशन मिळेल. समजा, तुम्ही जर मित्राच्या मोबाइलवर १०० रुपयांचे रिचार्ज केल्यास कमिशन म्हणून ४ रुपये मिळतील. हे ४ रुपये तुमची कमाई असेल. वाचा: Jio POS Lite अॅपवर असे करा रजिस्टर
- सर्वात प्रथम JioPOS Lite अॅपला गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करा.
- त्यानंतर Allow All’ वर टॅप करा. याद्वारे अॅपला सर्व अॅक्सेस मिळेल.
- आता साइन इन/साइन अप हे पेज दिसेल. त्यातील साइन अपवर टॅप करा.
- यात तुम्हाला ई-मेल आयडी आणि जिओ नंबर द्यावा लागेल.
- त्यानंतर जनरेट ओटीपीवर टॅप करा. त्यानंतर मोबाइल नंबरवर आलेला ओटीपी व्हेरिफाय करा.
- आता तुमचे नाव, ई-मेल आयडी इत्याही माहिती स्क्रीनवर दिसेल.
- आता Choose your work location ऑप्शनवर टॅप करा. लोकेशन बरोबर असल्यास Done वर टॅप करा.
- आता नियम व अटी मंजूर करून Continue वर टॅप करा.
- पुढे लॉग इनवर टॅप करा. आता नंबर टाकल्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल. हा ओटीपी व्हेरिफाय करा.
- त्यानंतर तुम्हाला mPIN क्रिएट करावा लागेल. त्यानंतर सेटअपवर टॅप करा.
- यासाठी होम स्क्रीनवरील रिचार्जवर टॅप करा. त्यानंतर ग्राहकांचा जिओ नंबर टाकून सबमिटवर टॅप करा.
- आता लिस्टमधील एक प्लान निवडून Buy वर टॅप करा.
- त्यानंतर mPin टाकून प्रोसेस पूर्ण करावी लागेल.
- पुढे ट्रांजॅक्शन आयडीसह स्क्रीनवर एक मेसेज दिसेल.
- शेवटी Done वर टॅप केल्यानंतर रिचार्ज होईल.
- लक्षात ठेवा की, कोणत्याही नंबरवर रिचार्ज करण्यासाठी तुमच्या अकाउंटमध्ये कमी कमी ५०० रुपये बॅलेन्स असणे गरजेचे आहे.
- तसेच, अॅपवर कमाई पाहण्यासाठी होम स्क्रीनवरील My Earnings वर जावे लागेल. येथे तुम्हाला तुमची कमाई दिसेल. तसेच, शेवटच्या २० दिवसांचे ट्रांजॅक्शन देखील पाहू शकता.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/ISYGBz3