भारतीय बाजारात अनेक कंपन्या दर महिन्याला नवनवीन स्मार्टफोन लाँच करत आहेत. कमी किंमतीत ग्राहकांना प्रीमियम फोन्सचे फीचर्स उपलब्ध करून देण्याचा या कंपन्यांचा प्रयत्न आहे. यापैकीच एक स्मार्टफोन निर्माता कंपनी Infinix ही आहे. कंपनी सातत्याने भारतीय बाजारात आपल्या नवीन हँडसेट्सला लाँच करत आहे. तसेच, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपल्या स्मार्टफोन्सवर अनेक आकर्षक डील्स देखील देत आहे. कंपनीने आता भारतात नवीन सेलची घोषणा केली आहे. या सेलमध्ये कंपनीच्या दोन स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंटचा फायदा दिला जात आहे. या सेलमध्ये ग्राहक Infinix Note 11 आणि Infinix Note 11S या फोन्सला आकर्षक ऑफर्ससह खरेदी करू शकतात. २५ मार्चपासून सुरू झालेल्या या सेलचा ३१ मार्चपर्यंत फायदा घेता येईल. तुम्ही जर स्वस्त स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही ऑफर तुमच्या फायद्याची ठरेल. याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/HF6lp2W