Full Width(True/False)

Samsung करणार धमाका! लाँचआधीच लीक झाली Galaxy A53 5G फोनची किंमत-फीचर्स, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : निर्माता कंपनी आपल्या गॅलेक्सी ए सीरिजमधील नवीन हँडसेट ला लाँच करण्याच्या तयारीत आहे. फोनला कंपनी कधी लाँच करणार आहे, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. परंतु, Samsung Galaxy A53 5G ऑनलाइन पाहण्यात आले आहे. अपकमिंग फोनला एका रिटेलरच्या वेबसाइटवर पाहण्यात आले आहे. या लिस्टमध्ये फोनचे ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मॉडेल दिसत असून, याची किंमत ४६६.४९ EUR (जवळपास ३९,२०० रुपये) आहे. Samsung Galaxy A53 5G स्मार्टफोन गेल्यावर्षी लाँच झालेल्या Samsung Galaxy A52 5G ची जागा घेईल. वाचा: या स्मार्टफोनमध्ये Exynos १२०० चिपसेटचा सपोर्ट दिला जाईल. तसे, १२० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह ६.५ इंच सुपर एमोलेड डिस्प्ले मिळेल. या अपकमिंग स्मार्टफोनच्या किंमतीचा देखील खुलासा झाला आहे. Samsung Galaxy A53 5G ची किंमत ३० हजार रुपयांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. इटॅलियन रिटेलर लिस्टिंगनुसार, फोनच्या ६ जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत ४६६.४९ EUR (जवळपास ३९ हजार रुपये) असेल. कंपनी या फोनला अन्य मॉडेलमध्ये देखील लाँच करण्याची शक्यता आहे. Samsung Galaxy A53 5G चे संभाव्य स्पेसिफिकेशन Samsung Galaxy A53 5G स्मार्टफोनमध्ये ६.५ इंच सुपर एमोलेड डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता असून, याचे रिझॉल्यूशन १०८०x२४०० पिक्सल आणि रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज असेल. हा फोन Exynos १२०० ऑक्टा-कोर प्रोसेसर सपोर्टसह येईल. याआधी गीकबेंच लिस्टिंगवरून देखील फोनची माहिती समोर आली होती. या लिस्टिंगनुसार फोनला ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजसह सादर केले जाऊ शकते. तसेच, मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेजला १ टीबीपर्यंत वाढवता येईल. फोटोग्राफीबद्दल सांगायचे तर या हँडसेटमध्ये ६४ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा दिला जाईल. तसेच, १२ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि दोन ५ मेगापिक्सलचे कॅमेरे मिळतील. सेल्फीसाठी यात फ्रंटला ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाईल. पॉवर बॅकअपसाठी हा फोन २५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल. यात ५००० एमएएचची बॅटरी मिळेल. तसेच, यूएसबी टाइप-सी सपोर्ट मिळेल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/7lCSspy