स्मार्टफोनप्रमाणेच सध्या लॅपटॉप देखील महत्त्वाचा झाला आहे. कॉलेजच्या प्रोजेक्टपासून ते ऑफिसच्या कामापर्यंत अनेक गोष्टी लॅपटॉपच्या माध्यमातून सहज शक्य होते. बाजारात अनेक Chromebook उपलब्ध आहे. क्रोमबुक हे विंडोज आणि मॅक लॅपटॉपला गुगलचे उत्तर आहे. गेल्या काही वर्षात Google ने क्रोमओएसमध्ये अनेक सुधारणा केल्या आहेत. त्यामुळे आज प्रत्येक कॉम्प्युटर ब्रँड क्रोमबुक प्रदान करत आहे. क्रोमओएसवर चालणारे हे लॅपटॉप क्रोम ब्राउजरवर आधारित एक ऑपरेटिंग सिस्टम आहे. हे पीसी आणि मॅकबुकपेक्षा वेगळे आहे. तुम्ही क्रोमओएसच्या मदतीने लॅपटॉपवर नियमित कामे सहज करू शकतात. तुम्ही जर स्वतःसाठी अथवा इतरांसाठी नवीन लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बाजारात अनेक शानदार लॅपटॉप उपलब्ध आहेत, जे क्रोमओएससह येतात. ३० हजार रुपयांच्या बजेटमध्ये येणाऱ्या बेस्ट क्रोमबुक लॅपटॉपविषयी सविस्तर जाणून घेऊया.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/m6lC708