Amazon India ने लेटेस्ट स्मार्टफोन आणि एक्सेसरीजवर ऑफर देण्यासाठी ‘Mobile Savings Days’ ची घोषणा केली आहे. मोबाइल सेविंग डेज सेल मध्ये ग्राहकांना ४० टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते. अमेझॉनवर हा सेल २९ जुलै २०२२ पर्यंत सुरू राहणार आहे. अमेझॉनच्या या सेलमध्ये Samsung 13 Series, Redmi K50i 5G, Tecno Spark 9, Tecno Camon 19 Neo आणि iQOO Neo 6 सारख्या स्मार्टफोन्सला डिस्काउंट ऑफर मध्ये खरेदी करू शकता. सेलमध्ये क्रेडिट आणि डेबिट कार्ड द्वारे पेमेंट केल्यानंतर ग्राहकांना १० टक्के इंस्टेंट डिस्काउंट (७५० रुपयेपर्यंत) आणि ईएमआय ट्रान्झॅक्शन द्वारे खरेदी केल्यानंतर १ हजार रुपयांपर्यंत सूट मिळते. याशिवाय, एचडीएफसी बँक डेबिट आणि क्रेडिट कार्ड द्वारे पेमेंट केल्यानंतर ६ महिन्याची फ्री स्क्रीन रिप्लेसमेंट आणि ३ महिन्यासाठी नो कॉस्ट ईएमआय ऑफर दिली जाते.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/chbLtV4