नवीन फोन खरेदी केल्यानंतर आपण हाच विचार करतो की, आता कोणत्याही प्रकारची समस्या येणार नाही. फोनची मेमरी खाली आहे. फोन हँग होणार नाही. ऑपरेटिंग सिस्टम नवीन आहे तर स्मूथ काम करेल. तसेच कॅमेरा नवीन असल्याने चांगली फोटोग्राफी करता येईल. परंतु, महिना उलटताच काही जण फोन संबंधी तक्रारी करायला सुरुवात करतात. यात अनेकांची तक्रार ही असते की, फोन गरम होत आहे. नवीन फोन असो की जुना गरम होण्याची समस्या ही अनेकांना येते. कधी कधी ही समस्या धोकादायक ठरू शकते. जितकी जास्त ही समस्या ऐकायला मिळते तितक्या वेळा फोनला ठीक करण्यासाठी सर्विस सेंटरला जावे लागते. परंतु, आज आम्ही तुम्हाला १० ट्रिक्स सांगणार आहोत.फोन गरम होण्याचे कारणजर तुमचा फोन गरम होत असेल तर सर्वात आधी हे जाणून घ्या की, कोणत्या फीचरचा वापर केल्यानंतर फोन गरम होत आहे. अनेक फोन हे चार्जिंगवेळी गरम होतात. तर काही फोन इंटरनेटचा वापर करताना गरम होतात. काही फोनमध्ये कॉलिंग दरम्यान गरम होण्याची तक्रार असते, तर काही फोनमध्ये कॅमेराचा वापर करताना समस्या येते.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/bUqazM7