मुंबई- एखाद्याच्या चेहऱ्यावरचं दुःख आणि उदास डोळेही कुणाच्या आयुष्यात रंग भरू शकतात हे खरं तर पटणार नाही. पण असंच काहीसं होतं ते जुन्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री राखी गुलजार. ७० ते ९० च्या दशकात प्रेयसीपासून आईपर्यंतच्या भूमिका साकारून या अभिनेत्रीने हिंदी सिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली. बॉलिवूडमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयाद्वारे नाव कमावलेली अभिनेत्री राखी सध्या मोठ्या पडद्यापासून दूर असल्या तरी त्यांच्या सशक्त भूमिकांसाठी त्या नेहमीच लक्षात राहतात. १५ ऑगस्ट १९४७ रोजी राणाघाट येथे जन्मलेल्या राखी यावर्षी त्यांचा ७५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल फारशा गोष्टी लोकांना माहीत नाही. त्यातील मुख्य घटनांवर आज प्रकाश टाकू.
from Bollywood & Marathi Movies Serials News in Marathi | Entertainment News https://ift.tt/xiA6apI