लक्ष्मीकांत बेर्डे यांनी गणेशोत्सव; तसेच आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमधून अभिनयाला सुरुवात सुरू केली. मुंबई मराठी साहित्य संघातून व्यावसायिक नाट्यसृष्टीत पदार्पण केले. १९८३-८४ मध्ये पुरुषोत्तम बेर्डे यांच्या 'टूर टूर' या नाटकात प्रमुख भूमिका साकारली. 'बिघडले स्वर्गाचे दार', 'शांतेचं कार्ट चालू आहे' या नाटकांतील भूमिकांसाठी त्यांना दाद मिळाली. १९८५ मध्ये 'लेक चालली सासरला' या मराठी चित्रपटातून नायक म्हणून पदार्पण केले. त्यानंतर 'दे दणादण', 'धूमधडाका', 'अशी ही बनवाबनवी', 'थरथराट', 'बाळाचे बाप ब्रह्मचारी', 'झपाटलेला' असे अनेक मराठी सुपरहिट चित्रपट त्यांनी दिले. दरम्यान, 'मैंने प्यार किया', 'साजन', 'बेटा', 'हम आप के है कौन' या सुपरहिट हिंदी चित्रपटांतल्या त्यांच्या भूमिकाही गाजल्या. नव्वदच्या दशकात मराठी चित्रपटसृष्टी तारणाऱ्या अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे या मित्रत्रयीचे आजही कौतुक होतं.
from Bollywood & Marathi Movies Serials News in Marathi | Entertainment News https://ift.tt/N1HB2fG