भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने देखील Jio सारखी खास स्वातंत्र्य दिनाची ऑफर आणली आहे. ऑफर अंतर्गत, कंपनी आपल्या काही योजना कमी किमतीत डिस्काउंटसह ऑफर करत आहे. यामध्ये ४४९ रुपये, ५९९ रुपये आणि ९९९ रुपयांच्या प्लान्सचा समावेश आहे. BSNL स्वातंत्र्य दिन ऑफर 2022 अंतर्गत, कंपनी या फायबर ब्रॉडबँड सेवा प्लान्सवर जोरदार सवलत देत आहे. ४४९ रुपयांचा प्लान हा सरकारी कंपनीचा एंट्री लेव्हल ब्रॉडबँड प्लान आहे. तर, दुसरीकडे जिओ देखील स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, युजर्ससाठी स्वातंत्र्य दिनानिमित्त अनेक ऑफर्स देत आहे.विशेष म्हणजे कंपनी Jio फायबर प्लानच्या ग्राहकांना १५ दिवसांची अतिरिक्त वैधता देत आहे: चला या ऑफरबद्दल सविस्तर जाणून घेऊया. एकूणच Independence Day च्या निमीत्ताने BSNL आणि Jio युजर्सना काही जबरदस्त प्लान्सचा फायदा कमी किमतीत घेता येणार आहे.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/ukUhb7a