सॅमसंग (Samsung) भारतासह जगातील सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन्स ब्रँडपैकी एक आहे. भारतीय यूजर्सकडून सॅमसंगच्या फोन्सला मोठी पसंती मिळते. कमी किंमत आणि दमदार फीचर्ससोबतच चांगल्या बिल्ड क्वालिटीसाठी सॅमसंगच्या फोन्सला ओळखले जाते. तुम्ही देखील Samsung चे फॅन असाल व कंपनीचे लेटेस्ट स्मार्टफोन्स खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. सॅमसंगने गेल्याकाही दिवसात आपल्या अनेक लोकप्रिय स्मार्टफोन्सच्या किंमतीत मोठी कपात केली आहे. कंपनीने आपल्या काही दिवसांपूर्वीच लाँच झालेल्या फोनच्या किंमतीत जवळपास ५ हजार रुपयांपर्यंत केली आहे. किंमत कमी झालेल्या फोन्समध्ये Samsung Galaxy A33 5G, Samsung Galaxy M12, Samsung Galaxy S21 FE 5G, Samsung Galaxy A22 5G, Samsung Galaxy F22 आणि Samsung Galaxy M32 चा समावेश आहे. या फोन्सच्या नवीन किंमतीविषयी जाणून घेऊया.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/8bJftNe