इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये एका पेक्षा एक जबरदस्त स्मार्टफोन लाँच केले जात आहेत. प्रत्येक आठवड्याला वेगवेगळ्या कंपन्या आपले वेगवेगळे स्मार्टफोन लाँच करीत आहेत. परंतु, सप्टेंबर महिन्यात मोठ मोठ्या कंपन्या आपले अनेक स्मार्टफोन लाँच करणार आहेत. अॅपल कंपनी आयफोन १४ सीरीज याच महिन्यात लाँच करणार आहे. या फोनला ७ सप्टेंबर रोजी लाँच केले जाणार आहे. विवो कंपनी आपल्या vivo V25 5G ला लाँच करणार आहे. सोबत मोटो सुद्धा आपल्या नवीन Moto X30 Pro ला लाँच करण्याची तयारी करीत आहे. तुम्हाला जर शानदार फ्लॅगशीप किंवा मिड रेंज फोन खरेदी करायचा असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खास आहे. या रिपोर्टमधून आम्ही तुम्हाला सप्टेंबर महिन्यात लाँच करण्यात येणाऱ्या स्मार्टफोन्सची माहिती देत आहोत. जाणून घ्या डिटेल्स.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/1T5FG8M