Sheezan Khan Sent To 4 Day Police Custody: २० वर्षीय अभिनेत्री तुनिषा शर्माची आत्महत्या संपूर्ण टेलिव्हिजन विश्वाला हादरवून सोडणारी घटना होती. शनिवारी अभिनेत्रीने हे टोकाचे पाऊल उचलले. शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास 'अली बाबा: दास्ता-ए-काबुल' मालिकेच्या सेटवरच तुनिषाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. दरम्यान मुंबईतील जेजे रुग्णालयात अभिनेत्रीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्यातून महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले. अभिनेत्रीचा मृत्यू गुदमरुन झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले. या प्रकरणातील मुख्य आरोप असणाऱ्या शीझान मोहम्मद खानच्या पोलीस कोठडीविषयीही महत्त्वाचे अपडेट देण्यात आले आहे. जाणून घ्या या तुनिषा शर्मा मृत्यू प्रकरणाशी संबंधित आतापर्यंतचे महत्वाचे अपडेट
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/GTl8wnP