Apple's iPhone Fact: स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांना आयफोन खरेदी करायचा असतो परंतु, याची किंमत जास्त असल्याने तो खरेदी करणे शक्य होत नाही. आयफोन जबरदस्त परफॉर्मन्स आणि दमदार सिक्योरिटीसाठी ओळखला जातो. आयफोनमध्ये जबरदस्त व लेटेस्ट टेक्नोलॉजी नेहमीच दिली जाते. आयफोन खरेदी करण्यासाठी लाखो रुपये मोजायची तयारी ठेवली जाते. जगभरात आयफोन खरेदी करणाऱ्यांची संख्या कोट्यवधींच्या घरात आहे. अनेकांकडे आयफोन आहे. परंतु, आयफोन मधील आय चा अर्थ किती जणांना माहिती आहे, असे विचारल्यावर अनेकांना ते माहितीच असेल असे नाही. आज आम्ही तुम्हाला या आर्टिकलमध्ये आयफोनमधील आय चा अर्थ काय आहे, आयफोन कधीपासून लाँच करण्यात आला आहे. आतापर्यंत किती मॉडल लाँच करण्यात आले आहेत. याची सविस्तर माहिती देत आहोत. जाणून घ्या डिटेल्स.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3JbyxaZ