Top Smartphones : भारतीय स्मार्टफोनची बाजारपेठ आता पूर्वीपेक्षा खूप मोठी झाली आहे. तसेच, भारतात 5G लाँच झाल्यापासून, 5G स्मार्टफोनची मागणी देखील लक्षणीय वाढली आहे. स्मार्टफोनच्या किमतीही पूर्वीच्या तुलनेत वाढल्या आहेत. फ्लॅगशिप स्मार्टफोन्सच्या किमती देखील चांगल्याच वाढल्या आहेत. आता स्मार्टफोन कंपन्या एका श्रेणीतील अनेक स्मार्टफोन्स देत आहेत, जे यूजर्सच्या गरजा लक्षात घेऊन सादर केले जात आहेत. आता OnePlus, Samsung, Redmi आणि Realme सारखे ब्रँड मिड-रेंज आणि प्रीमियम मिड-रेंज मार्केटमध्ये चांगले स्मार्टफोन घेऊन येत आहेत. जर तुम्ही 4G वरून 5G वर अपग्रेड करण्याचा विचार करत असाल आणि ३० हजारांच्या खाली चांगला 5G फोन शोधत असाल तर, ही माहिती तुमच्या कामी येईल. आज आम्ही तुम्हाला ३०,००० रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहो. तसेच, त्यांच्या 5G सपोर्टेड बँडबद्दलही माहिती देणार आहो.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/oWBFPni