Shiv Thakare Returned To Amaravati: 'अमरावतीकरांच्या सहकार्यानेच मी आज इतके मोठे यशाचे शिखर गाठू शकलो. मैत्रीमुळे खूप लोक जुळतात हे मी बिग बॉसच्या घरात अनुभवले आहे. आपले प्रेझेंटेशनच आपले यश ठरविते असे मत अमरावतीतील स्थानिक श्रमिक पत्रकार भवन येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत शिव ठाकरेने व्यक्त केले. बिग बॉस १६ हे पर्व अलीकडेच पार पडले. या सीझनमध्ये पुण्याचा एमसी स्टॅन उर्फ अल्ताफ हा विजेता ठरला तर फर्स्ट रनरअप शिव ठरला. दरम्यान शिव तब्बल चार महिन्यानंतर बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला अन् १४ फेब्रुवारी रोजी अमरावती याठिकाणी असणाऱ्या अंबानगरीमध्ये पोहोचला होता. यावेळी त्याचे भव्य असे स्वागत स्थानिक फरशी स्टॉप येथे झाले. त्याच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती, ही गर्दी पाहता शिवने जरी ट्रॉफी जिंकली नसली तरी त्याने लाखो जणांची मनं जिंकली आहेत हेच स्पष्ट होते...
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/Zgzm8xu