मुंबई- आज ८ मार्च जागतिक महिला दिन. समस्त स्त्रीवर्गाचा आदर आणि स्त्रीशक्तीचा जागर करण्याचा दिवस. असं कोणतंही क्षेत्र नाही जिथे स्त्रीचा वावर नाही. प्रत्येक कामात स्त्रियांनी स्वतःला सिद्ध केलंय. प्रत्येक काम लिलया पार पाडलंय. आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिया काम करताना दिसतात. स्वतःला सिद्ध करतात. काम आणि घराची, मुलांची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडताना दिसतात. काही स्त्रिया तर एकट्याने मुलांचा सांभाळ करताना देखील दिसतात. नवऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहत काम करत आपल्या मुलांचं एकट्याने पालनपोषण करतात. त्यांच्यासाठी दिवसरात्र मेहनत करताना दिसतात. बॉलिवूडचं नाही तर मराठी चित्रपटसृष्टीमध्येही अशा काही स्त्रिया आहेत ज्यांनी नवरा नसताना एकट्याने मुलांचा सांभाळ केलाय. पाहूया अशाच काही अभिनेत्री.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/FHlemLu