ही गोष्ट आहे 'सिलसिला' चित्रपटाची, ज्याचं शूटिंग यश चोप्रांसाठी कोणत्याही संकटापेक्षा कमी नव्हतं. एकीकडे अमिताभ आणि रेखा यांच्या नात्याबद्दल सेलिब्रिटींपासून ते सर्वसामान्यांपर्यंत प्रत्येकजण बोलत होतं. तर दुसरीकडे रेखा आणि जया बच्चन यांना कॅमेऱ्यात एकत्र चित्रित करणं ही साधी गोष्ट मुळीच नव्हती. ही अशी परिस्थिती होती, ज्यामुळे हे प्रकरण कोणत्याही क्षणी चिघळू शकलं असतं. यश चोप्रादेखील अशी परिस्थिती टाळण्यासाठी खूप काळजी घेत होते. काश्मीरमध्ये सुरू असलेल्या चित्रीकरणावेळी कोणत्याही मित्राला सेटवर प्रवेश नव्हता तसेच प्रसारमाध्यमांनाही सेटच्या आसपास भटकण्याची परवानगी नव्हती. यश चोप्रा अतिशय हुशारीने सिनेमाचं चित्रीकरण करत होते आणि त्यांनी स्वतः सांगितले होते की शूटिंगदरम्यान ते केवळ सावधच नव्हते तर अत्यंत घाबरलेले होते. कारण हा चित्रपट वास्तविक जीवनातील प्रेमकथा दाखवत होता.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/Xhd5TPj