मिस्टर इंडिया चित्रपटात एक इंग्रज हनुमानाची मूर्ती चोरतानाच सीन दाखवला आहे. तो इंग्रज म्हणजे अभिनेते बॉब क्रिस्टो. अमिताभ बच्चन यांच्या 'हम जहां खड़े होते हैं लाइन वहीं से शुरू होती है' या प्रसिद्ध डायलॉगदरम्यान अमिताभसोबत भांडणारी व्यक्तीही बॉब होती. त्यांनी अनेक चित्रपट केले, अनेक मोठ्या भूमिका साकारल्या, मात्र तरीही त्यांच्या चाहत्यांची संख्या कमी आणि द्वेष करणाऱ्यांची जास्त होती. बॉब क्रिस्टो यांचे खरे आयुष्य इतके रोमांचक होते की त्यांच्यावर चित्रपट बनू शकतो. सिडनीत जन्मलेले बॉब क्रिस्टो ऑस्ट्रेलियातून मस्कटला गेले, पण व्हिसा न मिळाल्याने त्यांना भारतातच राहावे लागले. परवीन बाबींना एका पोस्टरवर पाहून ते अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते. परवीन यांना भेटण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले, पण मेकअपशिवाय अभिनेत्रीला पाहून त्यांना प्रचंड राग आला होता.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/LWP4Vcu