Aai Kuthe Kay Karte Latest Update: एपिसोडच्या सुरुवातीलाच ईशा तिच्या आई अरुंधतीचं अजिबात ऐकून न घेता तिला ऐकवण्यास सुरुवात करते. तुझं मी का ऐकू? मला थोबाडीत मारून झालं का? असे सवाल ती तिच्या आईला विचारते. शिवाय असाही आरोप करते की अरुंधतीचा त्यांच्या (ईशा-अनिश) लग्नाला विरोध आहे आणि बाबा परस्पर ही गोष्ट करत आहेत, त्यामुळे अरुंधती त्यांना थांबवत आहेत. तेव्हा अरुंधती म्हणते की अनिश चांगला मुलगा आहे, पण ही वेळ योग्य नाही. ईशा घराबाहेर पळून गेल्याने तिला अनिरुद्ध आता पुन्हा बाहेर जाऊ देणार नाही याची भीती तिला वाटत असते. तर अरुंधती अशी भीती व्यक्त करते की जर आता ईशाने तातडीने लग्न केलं तर जगात तिला किती अडचणींचा सामना करावा लागेल. शिवाय ती ईशाला शिक्षण पूर्ण करण्याचं महत्त्वही समजावून सांगते. 'लग्न ही एकच गोष्ट आयुष्यात नसते', ही बाब ती तिला समजावते, तरीही ईशा तिचं अजिबात ऐकून न घेता खोलीबाहेर जाण्यास सांगते.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/4fjiV57