१ फेब्रुवारी १९५७ रोजी मुंबईत जन्मलेले जॅकी सिनेसृष्टीत येण्यापूर्वी 'जय किशन काकूभाई श्रॉफ' या नावाने ओळखले जात होते. एका मित्राच्या सांगण्यावरून त्यांनी सिनेसृष्टीत येण्यापूर्वी आपले नाव बदलून जॅकी श्रॉफ ठेवले. त्यांच्या चांगुलपणामुळे लोक त्यांना जग्गू दादा म्हणू लागले. हळूहळू हेच नाव प्रचलित झालं. मात्र, जग्गू दादा होण्यामागची कथा खूपच वेदनादायक आहे. खुद्द जॅकी यांनी ही गोष्ट त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केली होती. तसेच एका घटनेबद्दल ज्योतिषाने त्यांना कसे सावध केले होते हेही त्यांनी सांगितले होते. मात्र, ज्योतिषाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केल्याचा किती मोठा फटका त्यांना सहन करावा लागला हेही त्यांनी सांगितलं. आजमितीला जग्गू दादाच्या मनातलं ते दुःख तसूभरही कमी झालेलं नाही आणि असा एकही दिवस जात नाही की याचा त्यांना पश्चाताप होत नाही. आजही तो प्रसंग आठवला तर जग्गू दादांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/A9Q0BM1