Bharat Jadhav interviewअनेक यशस्वी सिनेमे दिल्यानंतर काही काळ स्वल्पविराम देऊन तो फक्त नाटकांमध्ये रमू लागला. त्याच्या नाटकांसाठी 'हाऊसफुल्ल'चा बोर्ड हमखास लागतो. गलगले असो, दामू असो किंवा मोरूची मावशी; न थकता, न थांबता नाटकाचे असंख्य प्रयोग करणारा हा अवलिया अभिनेता म्हणजे भरत जाधव. आजवर अनेक प्रयोग झालेल्या 'सही रे सही' या नाटकाचा वेग कमी करू या असं वाटेल तेव्हाच ते नाटक करणं थांबवेन; असं तो स्पष्ट करतो. एकांकिका, चित्रपट, नाटक अशा सुपरहिट प्रवासाचा अनुभव किश्यांच्या मैफलीतून त्यानं 'मटा कट्टा'च्या व्यासपीठावर पहिल्यांदाच मनमोकळेपणानं सांगितला.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/HDjRNZG