WhatsApp Security : व्हॉट्सॲप म्हणजे आजकाल प्रत्येकाच्या फोनमधील एक महत्त्वाचं मेसेजिंग ॲप झालं आहे. अगदी गप्पा-टप्पांसाठी केल्या जाणाऱ्या चॅटिंगपासून ते व्यावसायिक चॅटपर्यंत सारंकाही आजकाल व्हॉट्सॲपवर होत असतं. त्यामुळेच व्हॉट्सप कंपनी देखील आपल्या व्हॉट्सॲपसंबधित सिक्योरिटीमध्ये कोणतीच कमी ठेवत नाही. व्हॉट्सॲप दर महिन्याला आपला एक अहवाल प्रसिद्ध करत असते. या अहवालांत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खात्यांवर थेट बंदी घातली जाते, म्हणजेच संबधित अकाउंट्स बॅन केले जातात. हे काम युजर्सच्या सुरक्षेला लक्षात घेऊन केले जाते. दरम्यान आपण सर्वचजण व्हॉट्सॲप वापरत असतो. त्यामुळे आपण सर्वांनी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे ज्यामुळे आपण आपले खाते सुरक्षित ठेवू शकतो. अनेक वेळा अशा काही चुका आपल्याकडून होतात ज्यामुळे आपलं व्हॉट्सॲपअकाउंट थेट बॅन होऊ शकतं. तर अशा कोणत्या चुका आहेत, ज्या केल्यामुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन केलं जाऊ शकतं, ते जाणून घेऊ...
from Gadget News in Marathi | Computer, Mobile and Technology Updates in Marathi https://ift.tt/nP5Lj1V