अनिल शर्मा दिग्दर्शित आणि सनी देओल-अमिषा पटेल स्टारर चित्रपट 'गदर २' बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी करत आहे. पहिल्याच आठवड्यात जवळपास २८५ कोटींची कमाई करून या सिनेमाने नवा विक्रम केला. चित्रपट जगतातील तज्ज्ञांच्या मते, हे यश विशेष आहे कारण कमी स्क्रीन आणि कमी बजेट असूनही सनी देओलच्या चित्रपटाने चांगली कामगिरी केली. तसेच हा या वर्षातील आतापर्यंतचा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. गदर २ चे सर्व शो दिवसेंदिवस हाऊसफुल्ल होत आहेत आणि लोक तारा सिंगच्या अॅक्शनचा खूप आनंद घेत आहेत. गदर २ ने पहिल्याच आठवड्यात जवळपास २८५ कोटींची कमाई करून नवा विक्रम केला.शाहरुख खानच्या 'पठाण' नंतर पहिल्या सात दिवसांत सर्वाधिक कमाई करणारा हा २०२३ मधला दुसरा सिनेमा आहे.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/dQWicL8